बीड | एकदा लेकीला संधी दिली. यंदाच्या वर्षी लेकाला संधी द्या, असा भावनिक प्रचार करून धनंजय मुंडे यांचा आताच मानसिकदृष्ट्या पराभव झाला आहे, अशी बोचरी टीका भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.
गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने पंकजा भावनिक आवाहन करून लोकांना मतं मागतात, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. त्यावर भावनिक राजकारण कोण करतंय हे जनतेने आता चांगलं ओळखलंय, असा टोला त्यांनी धनंजय मुंडे यांना लगावला.
परळी मतदारसंघ बहीण-भावाची जहागिरी नाहीये. या मतदारसंघात आणखी कुणी चांगलं काम करणारा आला तर त्याचंही स्वागत आहे. पण लोकांचा वाली बनण्याचा वारसा मी चालवत असून तो यशस्वीपणे यापुढेही मी चालवेल, असंही पंकजा यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.
दरम्यान, परळी विधानसा मतदारसंघात काय होणार? भावाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार की बहिण पुन्हा एकदा जायंट किलर ठरणार, याकडे राज्याचं लक्ष लागलंय.
महत्वाच्या बातम्या-
फलटणमधून अंडरवर्ल्ड डाॅन छोट्या राजनच्या भावाला रिपाईने उमेदवारी केली जाहीर! https://t.co/0t9XiK9rlB #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 2, 2019
वंचित बहुजन आघाडीकडून आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार जाहीर https://t.co/YDXbuhcdZG
— थोडक्यात (@thodkyaat) October 2, 2019
मेधा कुलकर्णी म्हणतात, मला खंजीर खुपसून प्राण घेतला तरी चालेल पण…. https://t.co/BlBpX0ev5T @Medha_kulkarni @ChDadaPatil @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) October 2, 2019
Comments are closed.