औरंगाबाद महाराष्ट्र

असले चिछोरे चाळे करणे बंद करा; पंकजा मुंडे यांचा धनंजय यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा

बीड |  परळी पंचायत समितीच्या उद्घाटन कार्यक्रमावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे चांगल्याचं भडकलेल्या पाहायला मिळाल्या. साहजिकच त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरचा राग विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर काढला.

पंकजा मुंडे यांच्या हस्ते परळी पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे उद्घाटन संपन्न झाले. परंतू आदल्या दिवशीच राष्ट्रवादीने त्या इमारतीचं उद्धाटन उरकून घेतलं होतं. यावर असेल चिछोरे चाळे करणं बंद करा, असा निशाणा धनंजय मुंडे यांचं नाव न घेता पंकजा यांनी लगावला.

महाराष्ट्रात कुठेही पंचायत समितीचे उद्घाटन असो, अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, अशोक चव्हाण यांच्या पंचायत समितीचे उद्घाटन सुद्धा माझी एनओसी घेतल्याशिवाय होऊ शकत नाही. परळीचे काय घेऊन बसलात? असंही त्यांनी म्हटलं. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आहे.

परळी विधानसभेची राज्यातली हायव्होल्टेज लढत मानली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाऊ-बहिणींमधला कलगीतुरा आत्तापासूनच रंगायला चालू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

फायनल सामन्यअगोदर न्यूझीलंडने भारतीय क्रिकेटप्रेमींना केलं ‘हे’ आवाहन!

-पुणे विद्यापीठातला धक्कादायक प्रकार; विद्यार्थ्यांमध्ये संताप

-शिवसेनेच्या दोन नगरसेवकांमध्ये वाद; एकाने लगावली दुसऱ्याच्या कानशिलात

-उद्धव ठाकरेंचं पीक विमा आंदोलन होऊच देणार नाही- सुभाष देशमुख

मराठा आरक्षण मिळालं… अन् शेतकऱ्याचा मुलगा झाला क्लास-2 अधिकारी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या