मुंडे भाऊ-बहिणीविरोधात मराठा समाज आक्रमक, दोघांच्याही राजीनाम्याची केली मागणी

Pankaja Munde-Dhananjay Munde Resignation demand 

Pankaja Munde-Dhananjay Munde | मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन महाराष्ट्रातील वातावरण प्रचंड तापले आहे. या हत्येतील जवळपास सर्वच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तर, एक आरोपी अजूनही फरार आहे. सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणी अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड याच्यामुळे अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे देखील अडचणीत आले आहे. कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा माणूस असल्याने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (Pankaja Munde-Dhananjay Munde )

लातूरमध्ये चक्काजाम आंदोलन

अशात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावरही रोष व्यक्त केला जातोय. आता तर त्यांच्याही राजीनाम्याची मागणी होत आहे. आज (7 जानेवारी)लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे सकल मराठा समाजाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यामुळे लातूर-परभणी मार्गावर वाहतूक खोळंबली होती.

याठिकाणी मराठा समाज चांगलाच आक्रमक दिसून आला. सध्या रेणापूरमध्ये चक्काजाम आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली असून रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यावेळी मोर्चेकऱ्यांनी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय द्या, अशा घोषणा केल्या. तसेच इतरही काही मागण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात आले. (Pankaja Munde-Dhananjay Munde )

‘या’ मागण्यांसाठी करण्यात आले आंदोलन

संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा.या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत त्यांचा राजीनामा घ्यावा, देशमुख यांच्या परिवारास आर्थिक मदत करण्यात यावी, त्यांना शासकीय नोकरीत सामावून घेतले जावे या मागण्यांसाठी आज चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

लातूर शहरातील अहिल्यादेवी होळकर चौक, छत्रपती संभाजी राजे चौक, रेनापुर शहरातील रेनापुर नाका, बोरगाव काळे, लातूर नांदेड रस्त्यावरील चाकूर येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाची आता राज्यभर चर्चा असून त्यातच पंकजा मुंडे यांच्याही राजीनाम्याची मागणी करण्यात आल्याने मुंडे भाऊ-बहीण दोघेही अडचणीत येण्याची शक्यता आहे. (Pankaja Munde-Dhananjay Munde )

News Title :  Pankaja Munde-Dhananjay Munde Resignation demand 

महत्वाच्या बातम्या –

HMPV व्हायरसमुळे मृत्यू ओढावू शकतो का?; मोठी माहिती समोर

वाल्मिक कराडकडे कोट्यवधींची संपत्ती, आकडा पाहून अधिकारीही थक्क

पंकजा मुंडेंना कोणी पाडलं? सुरेश धस यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

राज्यात पुन्हा होम क्वारंटाईन, आयसोलेशन वॉर्ड?; धक्कादायक बातमी समोर

तुमचे सगळेच बुरखे काही महिन्यांतच फाटले; राऊतांचा सरकारवर निशाणा

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .