Top News

“मी आमदार झाले नाही पण माझ्यामुळे अनेक आमदार झालेत”

मुंबई | मी आमदार झाले नाही पण माझ्यामुळे अनेक जण आमदार झाले याचा मला आनंदच आहे, असं भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर झालेल्या भाषणानंतर त्यांनी आज मुलाखतीत सर्व गोष्टी स्पष्ट केल्या.

मी पक्ष सोडणार असल्याच्या वावड्या का कुठल्या माहित नाही, मी पॉवर गेम खेळतेय आणि मी दबावाचं वातावरण तयार करतेय अशी चर्चा रंगलीय. त्याच चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी मला कोअर कमिटीतून काढायला सांगितलं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

मला आता भाजप कार्यकर्ती म्हणून काम करायचं आहे. एनजीओच्या माध्यमातून काम करायचं आहे. मी का बंड करु? मी पक्ष सोडणार नाही. आता पक्षाने ठरवावं त्यांनी मला सोडायचं का नाही ते? मी कोअर कमिटीचं पद स्वत:साठी सोडलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या