बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोणत्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी मी…’; भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे कडाडल्या

बीड | शुक्रवारी सावरगावमधील भगवान भक्तीगडावर दसऱ्याच्या निमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर तोफ डागली. पंकजा मुंडे यावेळी हेलिकॅप्टरने भगवान गडावर दाखल झाल्या होत्या. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी केलेल्या भाषणात राज्यातील अनेक मुद्यांना हात घातला.

पंकजा मुंडे यांनी हेलिकॉप्टरमधून भगवान गडावर फुलं टाकली. कोणत्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी फुलं टाकत नव्हते. तर भगवानदादांसाठी आणि तुमच्यासाठी फुलं वाहत आहे. ही दसऱ्याची जी भक्ती आणि शक्तीची जी परंपरा कायम ठेवण्यासाठी तुम्ही घरची पूरणपोळी सोडून आलात. त्याबद्दल उपस्थितांचे मी मनापासून आभार मानते, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मुंडे घराण्याचा दसरा मेळावा भगवानगडावर झाला. आपण ज्याठिकाणी जन्म घेतला, त्या मातीचा, जातीचा आपल्याला कधी कमीपणा नाही वाटला पाहिजे, अशी गोपीनाथ मुंडेंची शिकवण आहे.  राजघराणं असो किंवा वंचितांमध्ये जन्म झालेला असो लाज वाटली नाही पाहिजे. आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे, त्यासाठी ही परंपरा उभी केली आहे. कोणत्या पक्षाचं, मताचं राजकारण नाही, तर सामान्यांची चळवळ या ठिकाणांहून सुरू होत असल्याचंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

दरम्यान, सरकारने नुसतं पॅकेज जाहीर करून चालणार नाहीत. प्रत्येकाच्या हातात मदत देऊन दिवाळी गोड करावी. राज्यात महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. तसेच ऊसतोड कामगारांचं पूढे काय झालं हे मला विचारता? त्याचबरोबर मराठा ,ओबीसी आरक्षणबाबतही मी आवाज उठवणार आहे, असंही पंकजा मुंडे म्हणल्या.

थोडक्यात बातम्या-

“आम्हाला जेल नवी नाही, बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसेना”

“महाराष्ट्राच्या घोटाळेबाज सरकारच्या घोटाळ्यांच्या पुतळ्याचं आज दहन करणार”

ट्विटरवर होतोय ‘आज का रावण नरेंद्र मोदी’ हा हॅशटॅग ट्रेंड’; तब्बल एवढ्या लोकांनी केलंय ट्विट

“आमचे राज्यात 22 खासदार होणार, 2024 मध्ये शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असेल”

मोठी बातमी! सिंघू सीमेवर तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More