बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंकजा मुंडे भाजपवर नाराज? ‘त्या’ वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

मुंबई | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची फायरब्रँड नेत्या अशी ओळख निर्माण झाली आहे. पण या फायरब्रँड नेत्या भाजपवर नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. पंकजा मुंडे यांची भाजपवरील नाराजी दुर झाली आहे. असं वाटत असताना त्यांच्या मनातील खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे. पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानामुळे त्यांची भाजपवरील नाराजी पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.

पंकजा मुंडे या बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीड गावात एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. तर यावेळी बोलताना मी फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवेन पण पदासाठी कोणापुढे हात पसरणार नाही, असं रोखठोक वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. या वक्तव्यामुळे पंकजा मुंडे यांची भाजपवरील नाराजी कायम असल्याचं समोर येत आहे पण पंकजा मुंडेंच्या नाराजीचा फटका भाजपला बसेल का?, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

पंकजा मुंडे यांचं नाव भाजपच्या बड्या नेत्यांच्या यादीत घेतलं जातं. पंकजा मुंडेंचा राज्यातील किमान 25 मतदारसंघात तरी थेट प्रभाव आहे. त्यात पंकजा मुंडे यांना पक्षात न्याय मिळत नाही या कारणामुळे कार्यकर्ते आणि त्यांच्या समर्थकातदेखील नाराजी आहे. पंकजा मुंडे यांनी त्यांच्या वक्तव्यातूनही त्यांची नाराजी दाखवली आहे. त्यामुळे आगामी काळात पंकजा मुंडेंच्या नाराजीचा फटका बसण्याची शक्यता बोलली जात आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात भागवत कराड यांचा समावेश झाल्यानंतर पंकजा मुंडे यांची अनेकदा भाषणातून नाराजी दिसून आली आहे. तर या निवडणुकांमध्ये दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेत्यांना संधी देण्यात आली. पण विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांचं कुठेही पुनर्वसन झालं नाही. त्यात चंद्रशेखर बावनकुळे यांचं भाजपकडून पुनर्वसन केलं जात असताना पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा नाही, त्यामुळेही पंकजा मुंडे यांची नाराजी पुन्हा एकदा दिसून आली आहे.

थोडक्यात बातम्या –

अनुपमा मालिकेतील ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं दु:खद निधन

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात पुन्हा संचारबंदीचे आदेश

‘ते’ चोख काम नवाब मलिकांनी केले आणि महाराष्ट्रावर उपकारच झाले

’75 वर्षात जितकी प्रगती करायला हवी होती तितकी…’, मोहन भागवतांनी केलं मोठं विधान

“राज्यातील वातावरण भाजपकडून गढुळ केलं जात आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More