महाराष्ट्र मुंबई

मला शून्यात जाऊन पुन्हा काम करायचंय- पंकजा मुंडे

मुंबई | गोपीनाथ गडावर झालेल्या भाषणानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. मला शून्यात जाऊन पुन्हा काम करुन स्वत:ला सिद्ध करुन दाखवायचं आहे, असं म्हणत पंकजा मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

माझ्यावर अशी टीका केली मला हे सगळं वडिलांंमुळे मिळालं. त्यामुळे मला शून्यात जाऊन काम करायचं आहे. मला आता पाहायचं आहे मी किती स्वर्गीय मुंडे साहेबांमुळे आणि किती स्वत: च्या कामामुळं. मी आधीच स्वत:ला सिद्ध केलंय पण आता पुन्हा सिद्ध कराचंय, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

मी माझ्या फेसबुक पोस्टवर पोस्ट लिहताना माजी मंत्री असं लिहू नका असं सांगितलं होतं. ट्वीटर हँण्डलवरही कधीच कमळाचं चिन्ह नव्हतं. त्यामुळे आता कमळ काढलं असं म्हणणं चुकीचं आहे, असंही पंकजांनी स्पष्ट केलं.

मी अजिबात तणावाखाली नाही. मी अस्वस्थ आहे. मी पॉवर गेम खेळतेय असं वातावरण तयार झालं. मी दबाव तयार करतेय अशा चर्चा रंगल्या आहेत, असं पंकजांनी स्पष्ट सांगितलं.

दरम्यान, मी पराभवाविषयी नाराज नाही. माझा झालेला पराभव हा माझा पराभव आहे कोणाचा विजय नाही, असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा स्वपक्षाला टोमणा मारला आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या