कोणी 22 वर्षांचा तरूण तर कोणी घरचा कर्ता, पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर 4 समर्थकांनी आयुष्य संपवलं

Pankaja Munde | लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) पराभव झाला. हा पराभव पंकजा मुंडेंच्या समर्थकांच्या जिव्हारी लागला आहे. यामुळे पंकजा मुंडेंच्या चार समर्थकांनी आत्महत्या केली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये एक समर्थक 22 वर्षीय तरूण असून त्याने आपलं जीवन संपवलं आहे. यामुळे आता पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) घरी जात त्यांची भेट घेतली आणि सांत्वन केलं आहे.

चार समर्थकांच्या आत्महत्येने हळहळ

पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) बीड लोकसभा मतदारसंघात पराभव झाला. तो पराभव पंकजा मुंडेंच्या समर्थकांच्या जिव्हारी लागला आहे. यामुळे आता पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde) समर्थकांनी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. बीड जिल्ह्यातील गणेश उर्फ हरिभाऊ बडे या तरूणाने जीवन संपवलं आहे. त्यापूर्वी लातूरमध्ये सचिन कोंडींबा मुंडे, पांडुरंग रामभाऊ सोनवणे, पोपट वायभसे यांनी आत्महत्या केली आहे.

मी पांडुरंग सोनवणे, माझी पंकजाताई मुंडे निवडणुकीत पराभूत झाल्या. मी सहन करू शकत नाही. म्हणून आत्महत्या करत आहे. अशी चिठ्ठी लिहून सोनवणे या तरूणाने आत्महत्या केली.

चार जणांनी आत्महत्या केल्याने पंकजा मुंडेंना धक्का बसला आहे. त्यांनी मृत तरूणांच्या घरच्यांची भेट घेतली होती. कोणत्याही नात्यावर इतकं प्रेम करू नये की त्यासाठी तुम्ही जीव द्यावा. तुम्हाला जर हिंमतीने लढणारा नेता हवा असेल तर मलाही हिंमतीने लढणारा कार्यकर्ता हवा आहे. कार्यकर्त्यांना मी यंत्रासारखे वापरले नाही. कुटुंबापेक्षा मी त्यांना अधिकच जवळचे समजते. आज मी पहिल्यांदा कमकुवत झाली आहे. मला अपराध्यासारखं वाटत आहे, असं त्या म्हणाल्या.

जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई

दरम्यान निवडणूक काळात बीड जिल्ह्यात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत. निकालानंतर सोशल मीडियावर अनेक पोस्ट दिसल्या पोलिसांनी अशा प्रकरणात एफआयआर दाखल केले आहेत. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलं आहे. जिल्ह्यात ऊस कामगार अधिक आहेत. पोलिसांची सोशल मीडियाने झोप उडवली. यावर पोलिसांनी पोस्ट संबंधीत माहिती देण्याचं आवाहन केलं आहे.

बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे विरूद्ध बजरंग सोनवणे यांच्यात लढत झाली. या लढतीत पंकजा मुंडे 6 हजार मतांनी पराभूत झाल्या. मतमोजणी केंद्रावरच पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांना तसेच त्यांच्या समर्थकांना अश्रू अनावर झाले नाहीत. पंकजा मुंडेंचा पराभव समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

News Title – Pankaja Munde Loss In Beed Loksabha Election After Pankaja Munde Supporter End Life

महत्त्वाच्या बातम्या

पुढील 48 तासांत ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

बॉयफ्रेंड मिळताच पत्नीने काढला पतीचा काटा, धक्कादायक प्रकार बघून पोलिसही झाले शॉक

महाराष्ट्र हादरला! भररस्त्यात लोखंडी पान्याने वार करत त्याने गर्लफ्रेंडला संपवलं, लोक बघत राहिले

राजकारण तापणार! शिंदे गटाच्या नेत्याचा प्रणिती शिंदेंवर गंभीर आरोप

“ही घराणेशाही नाही, शरद पवार आणि अजित पवारांचं कुटुंब वेगवेगळं”