Pankaja Munde | बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात लढत झाली. यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे हे विजयी झाले. पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. अशातच एका युवकाने पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) पराभव झाल्याने आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. यावर आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी ट्विट करत कार्यकर्ते तरूणांना आवाहन केलं आहे.
नेमंक काय घडलं?
लोकसभा निवडणुकीचा 4 जून रोजी निकाल पार पडला. याकडे साऱ्या देशाचं लक्ष होतं. या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघामध्ये शेवटी उशीरा निकाल लागला आहे. यामध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव घोषित करण्यात आला. यानंतर आता लातूर येथील येस्तार गावातील तरूणाने आत्महत्या केली आहे.
पंकजा मुंडेंचा पराभव हा केवळ भाजपच नाहीतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या तसेच काही युवकांच्या जिव्हारी लागल्याचं दिसून आलं आहे. या घटनेवर आता पंकजा मुंडे यांनी देखील ट्विट करत जनतेला आवाहन केलं आहे.
पंकजा मुंडेंचं ट्विट जसंच्या तसं
“स्वतःच्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही …मी लढत आहे संयम ठेवत आहे तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा..कोणी माझ्यासाठी जीव देणे कळतेय का किती कठीण आहे माझ्यासाठी??मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे … मी स्वीकारला आणि पचवला आहे पराभव तुम्ही ही पचवा!! ..अंधारी रात्री नंतर सुंदर प्रकाश असतो तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात.. शांत व सकारात्मक रहा”, असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
माझ्या मरणापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा…आई बापाला दुख देऊ नका… त्यांच्या जीवाला घोर लावून घेऊ नका…तुम्हाला शपथ आहे मुंडे साहेबांची…15 जूनपासून मी आभार दौरा करत आहे. सर्वांनी याची प्रतिक्षा करा, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, काल परवा अशीच एक घटना भिवंडी मतदारसंघात घडली असल्याचं दिसून आलं होतं. भिवंडी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस गटातून बाळ्या मामा विरूद्ध भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्यात लढत झाली होती. या लढतीकडे भिवंडीचे आणि अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं. याठिकाणी बाळ्या मामा यांचा विजय झाला. कपिल हे पराभूत झाले. यामुळे एका युवकाने आत्महत्या केली. कपिल पाटील यांच्या पराभव भाजप कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला.
News Title – Pankaja Munde Loss In Beed Loksabha Election After Young Men Suicide
महत्त्वाच्या बातम्या
“मस्ती आहे का?,ज्या दिवशी नरड्याला लागेल..”; मनोज जरांगेंचा नाव न घेता धनंजय मुंडेंना इशारा
गर्भवती महिलेला कारने दिली धडक, भयंकर अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर
राष्ट्रवादीला एकही मंत्रीपद नाही?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली अडचण
‘पंकजा मुंडेंना कॅबिनेटमंत्री करा’; बीडमध्ये झळकले बॅनर्स
मंत्रीपदासाठी अजित पवार गट अजूनही वेटिंगवरच?; समोर आलं मोठं कारण