महाराष्ट्र मुंबई

पंकजा मुंडेंनी घटवलं तब्बल 14 किलो वजन; पाहा कसं आहे डेली रुटीन!

मुंबई | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गेल्या सहा महिन्यात फिटनेसबाबत अधिक काळजी घेतली आहे. गेल्या सहा महिन्यात पंकजा मुंडेंनी तब्बल 14 किलो वजन घटवलं आहे. पंकजा मुंडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी फिटनेसबाबत भाष्य केलंय.

गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर प्रचंड तणाव आणि जबाबदारी आली. त्यामुळे साहजिक तणावाचा परिणाम तब्येतीवर होऊन माझं वजन वाढलं होतं. ते मला नेहमी टोचायचं. मला फिटनेसची आवड आहे. त्यामुळे मी गेले सहा महिने पूर्णवेळ फिटनेसला दिले, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

मंत्री असताना मला अनेक ज्येष्ठ लोकांनी फिटनेसच्या सूचना दिल्या होत्या. माझा अभिनेत्री शिल्फा शेट्टींसोबत परिचय झाला होता. त्या खूप योगासन करतात. अभिनेत्री अक्षय कुमार यांच्याशी जेव्हा परिचय झाला तेव्हा त्यांनीदेखील आम्हाला वजन कसं कमी करावं याबाबत सांगितलं. त्यांनी सांगितलेल्या सूचना मी फक्त ऐकायची. पण या सूचना मी गेल्या सहा महिन्यात अंमलात आणल्या. फिटनेसची सवय लागून जाते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

मी कामात इतकी व्यस्त होती की मी स्वत:कडे बघू शकली नाही. अखेर माझ्या लक्षात आलं की नाही आता भरपूर झालं. त्यात कोरोना आल्यामुळे थोडा वेळ मिळाला. त्या वेळेचा मी पूर्ण सदूपयोग केला. मी जवळपास 14 किलो वजन कमी केलं, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

‘नव्या कृषी कायद्यांचा उद्योगपतींनाच जास्त फायदा’; जागतिक बँकेच्या माजी अर्थतज्ज्ञांचं मत

गिनीज बुकमध्ये नाव असलेल्या मुंबईच्या तरूण व्यावसायिकाची आत्महत्या!

“रात्री 8 वाजता यायचं, काहीही बोलायचं आणि निघून जायचं, असं काम आम्ही करत नाही”

शेतकरी आंदोलन सुरुच रहावं अशी काहींची इच्छा- देवेंद्र फडणवीस

“आमच्या टप्प्यात आला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतोच”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या