Pankaja Munde | बीड लोकसभा मतदारसंघात काही दिवसांआधी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंच्या दोन समर्थकांनी आत्महत्या केली. त्यांनी आपला जीव गमावला असून आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पोपट वायबसे यांच्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथील राहत्या घरी जात कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) या भावूक झाल्याचे दिसून आले, त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी वायबसे कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. यावेळी पोपट यांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला.
यावेळी पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) वायबसे यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. पंकजा यांनी इतर कार्यकर्त्यांना देखील असं कृत्य करू नका, असं आवाहन केलं आहे. पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) काही दिवसांआधी एक व्हिडीओ ट्विट करत नागरिकांना आवाहन केलं होतं.
“…मला कोणीच एवढा जीव लावला नाही”
“मी काही कारस्थानांना घाबरत नाही. हे कारस्थान आपल्याला कळत नाही का? लोकं एक-एक लाखाने हारले आहेत. आपण थोडक्यात हारलो आहोत. हे आपल्याला कळालं नाही का? माझ्याकडे हे सर्व भरून काढण्याची संधी आहे. माझ्या लोकांनी जीव दिल्यानंतर मला असं वाटलं की, आपल्या आयुष्यात काहीतरी चुकलं. लोकं जीव देतील तर कसं जगायचं? तुम्ही मला एवढा जीव लावलाय की मला कोणीच एवढा जीव लावला नाही”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. मला हे बातम्यांसाठी करायचं नाही हे न्यूज आणि क्रेडिटचा विषय नाही, असं देखील पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
बीडमध्ये नेमकं काय झालं?
पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे यांच्याविरोधात लोकसभेच्या रिंगणात उभ्या होत्या. दोघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली होती. या लढतीत बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडेंना 6 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे.
भाजपचे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडेंच्या कुटुंबियांवर बीडकरांचं प्रेम आहे. पंकजा मुंडेंच्याआधी त्यांची बहीण प्रीतम मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार होत्या. यामुळे मुंडे कुटुंबावर बीडकरांचं एक विशिष्ट प्रेम आहे. गोपिनाथ मुंडे हे लोकप्रिय नेते होते. यामुळे बीडकरांनी देखील पंकजा मुंडेंवर प्रेम केलं आहे. असं असताना पंकजा मुंडेंचा झालेला पराभव हा बीडकरांच्या जिव्हारी लागला आहे.
News Title – Pankaja Munde Meet With Suicide Waybase Family Member
महत्त्वाच्या बातम्या
“नाद फक्त तुमचाच”, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा ‘तो’ व्हिडिओ तूफान व्हायरल
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट, मतमोजणीबाबत ठाकरे गटाचा गंभीर आरोप
‘सामे’ गाण्यावर सोनालीने लगावले ठुमके; दिलखेचक अदांपुढे सारेच घायाळ, पाहा Video
“देवेंद्र फडणवीसांनी सोलापूरात दंगली घडवण्याचा प्रयत्न केला”; कॉँग्रेसच्या आरोपांनी राज्यभर खळबळ
“झुंडमे कुत्ते आते है.. शेर अकेला आता आहे”; शिंदे गटाच्या बॅनरबाजीनंतर राणेंच्या बॅनरने वेधलं लक्ष