बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंकजा मुंडेंची नाराज समर्थकांसोबत महत्त्वाची बैठक; मुंडे भगिनींच्या भूमिकेकडे लक्ष

मुंबई | केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान बीड लोकसभा मतदारसंघाचा खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने मुंडे समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज झाल्याचं चित्र महाराष्ट्रभरात गेल्या काही दिवसात पाहायला मिळत आहे. मुंडे समर्थकांनी प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत भाजपमधून आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याच्या घटना घडल्या.

या सर्व प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. परंतु मुंडे भगिनी नाराज नसल्याचं त्यांनी उघडपणे स्पष्ट केलं आहे. मुंडे भगिनींनी नाराज नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतरही मुंडे समर्थकांच्या राजीनाम्याचा सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळालं. आतापर्यंत तब्बल 105 मुंडे भाजप पदाधिकारी असलेले मुंडे समर्थक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

पंकजा मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी दिल्ली येथील पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. त्यानंतर आज पंकजा मुंडे यांची मुंडे समर्थकांत सोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये पंकजा मुंडे नेमका काय निर्णय घेणार याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पंकजा मुंडे या काहीही वेगळा निर्णय घेणार नाहीत, असं मत भाजप नेते राम शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.

पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांना राजकारणातून भाजप नेहमीच डावलत असल्याचा आरोप मुंडे समर्थकांनी केला आहे. यासंबंधी नाराज समर्थ काम बरोबर होणाऱ्या बैठकीमध्ये नेमका काय तोडगा निघणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच पंकजा मुंडे काय निर्णय घेतात हे देखील पाहणं आवश्यक असणार आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More