Pankaja Munde | पंकजा मुंडे (Pankaja Munde) या भाजपच्या उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. मात्र यंदाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) पराभव होणार नाही असं वक्तव्य आता उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलं आहे. भास्कर जाधव यांनी विधान परिषदेत पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) विजय होणार असल्याचं वक्तव्य केलं. त्यामागील त्यांनी कारणही सांगितलं आहे. याआधी भाजपच्या नेत्यांनी पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) गेम केला होता असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं होतं. ते विधानभवन येथे पत्रकारांसोबत बोलत होते.
भाजपनेच पंकजा मुंडेंचा गेम केला – भास्कर जाधव
पत्रकारांसोबत बोलत असताना भास्कर जाधव यांना पंकजा मुंडेंबाबत विचारण्यात आलं होतं. त्यावर भास्कर जाधव यांनी भाजपनेच पंकजा मुंडेंचा गेम केला असल्याचं उत्तर दिलं. यामुळे भास्कर जाधव यांच्या उत्तराने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र यंदाच्या विधान परिषद निवडणुकीत असं होणार नाही. जर असं झालं तर त्या नेत्याची राजकीय कारकिर्द बरखास्त होईल असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.
यामुळे आता पंकजा मुंडेंच्या प्रेमापोटी नाहीतर आता स्वत:च्या राजकीय कारकिर्द वाचवण्यासाठी भाजप नेते पंकजा मुंडेंना निवडून आणतील, असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं आहे. महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार हे निवडून येतील. तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीच्या बेरजेवर राज्याच्या राजकारणाचं विश्लेषण करताना भास्कर जाधव यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
पंकजा मुंडे 2014 वर्षात जलसंधारण, ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण अशा तीन खात्यांचा कारभार सांभाळत होत्या. त्यावेळी पंकजा मुंडे या मुख्यमंत्री पदाच्या दावेदार होत्या. मात्र त्यांचा त्यावेळी पडता काळ सुरू झाला. 2019 च्या निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांचा पराभव केला. त्यानंतर पाच वर्षे पंकजा मुंडे यांचे विधानपरिषद किंवा राज्यसभेवर पुनवर्सन होणार, अशी केवळ चर्चा व्हायची. मात्र पदरी काहीच पडलं नाही. यामुळे पंकजा मुंडे राज्याच्या राजकारणातून आणखी दुरावल्या आहेत. 2024 या वर्षी त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी संधी दिली होती. मात्र शरद पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे यांनी त्यांना पराभूत केलं.
“10 वर्षांनंतर पंकजा मुंडेंच्या कपाळाला गुलाल लागणार”
यंदाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे विजयी झाल्यास नक्कीच फायदा होईल. यामुळे तगडा ओबीसी नेता हा विधिमंडळात येईल. तब्बल 10 वर्षांनंतर पंकजा मुंडेंच्या कपाळाला गुलाल लागेल. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता लागली आहे.
भाजपचे काही नेते हे महायुतीचेच उमेदवार विजयी होतील असा दावा करत आहेत. तर महाविकास आघाडीचे नेते देखील महाविकास आघाडीचे नेते विजयी होतील असा दावा करत आहेत.
News Title – Pankaja Munde Not Win In This Maharashtra MLC Election It Will Bad News For BJP Leaders
महत्त्वाच्या बातम्या
लग्न करायचं तर ‘अशा’ मुलींसोबतच करा; भाग्यही उजळेल आणि कायम आनंदी राहाल
महाराष्ट्रात श्रेयचोरांचा सुळसुळाट!, रोहित पवार आणि रवींद्र धंगेकरांचा उल्लेख
“आपण पुन्हा एकत्र यायला हवं”, संजय राऊतांची महायुतीच्या नेत्यांशी गळाभेट; राजकीय वर्तुळात एकच चर्चा
“स्मृती इराणी यांच्याबद्दल अपमानास्पद बोलणं बंद करा”; राहुल गांधींनी ट्वीट करत केलं आवाहन
सारा नाही तर ‘या’ अभिनेत्रीशी करणार शुभमन गिल लग्न?, चर्चेला उधाण