Top News औरंगाबाद महाराष्ट्र

विद्यार्थिनींनी घेतली प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ; पंकजा मुंडे संतापल्या

बीड | अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील महिला आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना  प्रेम, प्रेम विवाह आणि हुंडा घेऊन लग्न करणार नाही अशी शपथ घेण्यास भाग पाडण्यात आले आहे. या प्रकारामुळे राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

अमरावतीतील चांदुर येथील शाळेत मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ हा कमालीचा विचीत्र प्रकार घडला..शपथ मुलींना का आणि ती ही प्रेम न करण्याची…,असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे.

मुलींपेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे की एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास नाही देणार, कोणावर ऍसिड फेकणार नाही, जिवंत जळणार नाही..वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला जबरदस्त जवाब देणार, असंही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, आज जागतिक प्रेम दिन आहे. जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, विद्यार्थिंनींना प्रेम न करण्याची शपथ घ्यायला लावून शाळेने आपला संकुचित विचार दाखवला आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

मी पहिल्यांदा भारतीय नागरीक नंतर गायक- अदनान सामी

सोनिया गांधींना लिहलेल्या ‘त्या’ पत्रावर अशोक चव्हाण म्हणतात…

महत्वाच्या बातम्या- 

‘मी शपथ घेते की प्रेम आणि प्रेम विवाह करणार नाही’; ‘व्हॅलेंटाईन डे’ला विद्यार्थिनींचा निर्धार

गेल्या 20 दिवसांपासून हार्दिक पटेल गायब; पत्नी किंजलचा दावा

औरंगाबादचं नाव संभाजीनगर होत असेल तर यात वावगं काय?- राज ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या