“धनंजय मुंडेंनी भाजपशी गद्दारी करुन राष्ट्रवादीत जाण्यासाठी किती घेतले?”

बीड | भाजपशी गद्दारी करुन धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत जाण्यासाठी किती कोटी घेतले? असा पलटवार ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलाय. सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंकडून 15 कोटी रुपये घेतल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. 

धनंजय मुंडेंनी केलेले आरोप हास्यास्पद आहेत. अशाप्रकारचे बालिश आरोप करण्यात त्यांचा हात कोणीच धरु शकत नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. 

अजितदादा म्हणाले आमच्या पक्षात गद्दारांना स्थान नाही. जरा आजूबाजूला पाहा. गद्दारांना नाही म्हणाल तर बीडमध्ये राष्ट्रवादीत कुणीच राहणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय,