बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुंबई लोकल 7 दिवस बंद ठेवल्यास कोरोना संसर्ग टाळता येईल”

मुंबई | भाजपच्या नेत्या आणि माजी महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी कोरोनाच्या नियंत्रणासाठी मुंबई बंद करण्याच्या पर्यायावर भाष्य केलं आहे . जर नियोजनबद्धपणे मुंबई बंद ठेवण्यात आली तर त्याचा लाखो लोकांना उपयोग होईल, असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे.

जर 7 दिवसांसाठी लोकल ट्रेन बंद राहिल्या तर लाखो लोकांना कोरोनाच्या संसर्गापासून रोखण्यात मदत होईल. आवश्यक दुकानं उघडी ठेवता येतील, मात्र शॉपिंग बंद ठेवावी. अशा प्रयत्नांचा नक्कीच उपयोग होणार असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे.

कृपया ‘ताई भेटायचं’ आहे असं सतत मेसेज करणाऱ्यांना माझी विनंती आहे घरीच थांबा, जीवन मरणाचं कारण असेल तर ठीक. यंत्रणांना काम करू द्या, असं आवाहन  पंकजा मुंडेंनी नागरिकांना केलं आहे.

दरम्यान, मुंबई बंदची मदत होऊ शकते का? जर हे नियोजनबद्धपणे मुंबई बंद केली तर लोक यासाठी तयारी म्हणून जीवनावश्यक वस्तू घरात आणून ठेवतील, असंही त्यांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीसोबतचं नातं तोडाव नाहीतर… – रामदास आठवले

कोरोनाचा महाराष्ट्रात पहिला तर देशात तिसरा बळी!

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाचा महाराष्ट्रात पहिला तर देशात तिसरा बळी!

…अन् तेव्हापासून आईनं माझं नावं दगडू असं ठेवलं- सुशीलकुमार शिंदे

कोरोनाच्या धास्तीन ड्रंक अँड ड्राईव्हची पोलीस कारवाई रद्द

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More