काही दिवसात राष्ट्रवादीला मायक्रोस्कोपनं तपासावं लागेल!

बीड | काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मायक्रोस्कोपनं तपासावा लागेल, इतकी वाईट अवस्था त्यांची होणार आहे, असं ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. तपोवनमध्ये गाव तिथे विकास यात्रेच्या निमित्ताने त्या बोलत होत्या.

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेनंतर पंकजा मुंडे यांनी गाव तिथे विकास यात्रेचं आयोजन केलंय. तब्बल 45 गावांमध्ये ही यात्रा जाणार असून पंकजा मुंडे स्वतः जनतेशी संवाद साधत आहेत. 

दरम्यान, आम्ही राष्ट्रवादीप्रमाणे नुसत्या थापा मारल्या नाहीत, तर काम करुन दाखवलं, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.