जिथं कायदे बनतात तिथं कायदे मोडणाऱ्यांना पाठवणार का?; पंकजा मुंडेंचा सवाल

जिथं कायदे बनतात तिथं कायदे मोडणाऱ्यांना पाठवणार का?; पंकजा मुंडेंचा सवाल

अहमदनगर | विधानसभा आणि लोकसभा या सभागृहांमध्ये कायदे बनवले जातात. आता जिथं कायदे बनतात तिथं कायदे मोडणाऱ्यांना पाठवणार का?, असा सवाल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. शेवगावमधील सभेत नाव न घेता त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यावर जोरदार टीका केली.

डॉ. सुजय विखेंना ऑपरेशन करता येत नसल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. मात्र हे राजकीय ऑपरेशन ते व्यवस्थित करतील, असे सांगत तुम्हाला साधी दाढीसुद्धा नीट करता येत नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

खासदार प्रीतम मुंडे यांना लोकसभेत एक भाऊ हवा आहे. त्यामुळे सुजय विखे यांना प्रीतम यांच्यापेक्षा जास्त मतांनी विजयी करा, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं.

दरम्यान, स्व. राजीव राजळे यांच्याबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियात व्हायरल करण्यात आल्या आहेत. त्यावर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-राफेलचं प्रकरण…! आव्हाडांचं हटके अंदाजातील गाणं आणि भाजपला चिमटे

…तर मग त्यावेळी पवारांनी मोदींवर केस का ठोकली नाही- प्रकाश आंबेडकर

-…म्हणूनच काँग्रेसने आमच्यासोबत जुळवून घेतलं नाही- प्रकाश आंबेडकर

-राज ठाकरेंच्या सभेला आता कर्नाटकातून मागणी!

-रावसाहेब दानवेंच्या प्रचाराला आले अमित शहा, मात्र हजारो खुर्च्या मोकळ्या!

Google+ Linkedin