Top News

प्रीतम मुंडे यांच्यापेक्षा जास्त मतांनी डॉ. सुजय विखेंना निवडून द्या- पंकजा मुंडे

अहमदनगर | खासदार प्रीतम मुंडे यांच्यापेक्षा जास्त मतांनी डॉ. सुजय विखेंना निवडून द्या, असं आवाहन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्या शेवगावमध्ये आयोजित प्रचारसभेत बोलत होत्या.

प्रीतम मुंडे यांना लोकसभेत एक भाऊ पाहिजे. त्यासाठी सुजय यांना त्यांच्यापेक्षा जास्त मतांनी निवडून द्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं पंकजा म्हणाल्या.

रामायण-महाभारतापासून रक्ताच्या नात्यानं धोका दिल्याची उदाहरणं आहेत, मात्र रक्ताचं नाही तर कर्माचं नातं महत्त्वाचं आहे, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, ज्या सभागृहात कायदे बनवले जातात तिथं कायदे मोडणाऱ्यांना पाठवणार का?, असा सवाल उपस्थितांना करत पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा जोरदार समाचार घेतला.

महत्त्वाच्या बातम्या-

-राफेलचं प्रकरण…! आव्हाडांचं हटके अंदाजातील गाणं आणि भाजपला चिमटे

…तर मग त्यावेळी पवारांनी मोदींवर केस का ठोकली नाही- प्रकाश आंबेडकर

-…म्हणूनच काँग्रेसने आमच्यासोबत जुळवून घेतलं नाही- प्रकाश आंबेडकर

-राज ठाकरेंच्या सभेला आता कर्नाटकातून मागणी!

-रावसाहेब दानवेंच्या प्रचाराला आले अमित शहा, मात्र हजारो खुर्च्या मोकळ्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या