बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी एवढी मोठी नाही की, मला संपवण्यासाठी अगदी पंतप्रधानापासून कामाला लागतील”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. मोदींच्या मंत्रिमंडळात 43 नेत्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक मंत्र्यांना पदमुक्त करण्यात आलं तर नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने प्रीतम मुंडे यांच्यासह पंकजा मुंडेही नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

पंकजा मुंडे यांचं राजकारण भाजपला संपवायचं आहे, असा आरोप शिवसेनेने केला होता. यावर पंकजा मुंडे आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला मला संपवायचं आहे, असं मला वाटत नाही. मला वाटत नाही की मी एवढी मोठी आहे की मला संपवण्यासाठी अगदी पंतप्रधानापासून कामाला लागतील, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

मला वाटत नाही. मी अग्रलेख वाचला नाही. त्यामुळे त्यावर बोलणार नाही, असं सांगतानाच राजकारणात व्यवसाय म्हणून आले नाही. मी व्रत म्हणून मी आले आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. पत्रकार परिषद घेत त्यांनी सर्व चर्चांणा पुर्णविराम दिला.

दरम्यान, मी आणि प्रीतम मुंडे नाराज नाही. चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या. आम्ही कधीच मंत्रिपदाची मागणी केली नव्हती. भाजपच्या कोणत्याही निर्णयावर आम्हाला आक्षेप नसल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं. प

थोडक्यात बातम्या- 

“टीम देवेंद्र वगैरे असं आमच्याकडे नाही, मी-मी असं चालत नाही”

“मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्व भाजप नेत्यांना देवेंद्र फडणवीसांनी संपवलं”

…म्हणून मी नव्या मंत्र्यांचं अभिनंदन केलं नाही- पंकजा मुंडे

केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज का?; पंकजा मुंडे म्हणाल्या…

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये वाद?; नितीन राऊत, बाळासाहेब थोरात अचानक दिल्ली दरबारी

“पंकजाताई, ओबीसी जनगणनेच्या मागणीमुळे तुम्हाला मंत्रिपद दिलं नाही”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More