“जीव देऊन भागणार नाही बाळांनो, तुम्हाला माझी शपथ”; पंकजा मुंडेंची हात जोडून विनंती

Pankaja Munde | लोकसभा निवडणुकीचा 4 जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला. याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं. बीड, बारामती, शिरूर, सातारा, माढा, सोलापूर या प्रतिष्ठेच्या लढती होत्या. यामध्ये बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंनी गड राखला. शिरूरमध्ये अमोल कोल्हेंनी विजय मिळवला. तर सोलापूरमध्ये काँग्रेसच्या पहिल्या महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदेंचं नाव समोर आलं. सातारा लोकसभा मतदारसंघातून पिपाणी चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शशिकांत शिंदेंना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

तर दुसरीकडे सर्वात महत्त्वाची लढत होती ती म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ होय. याकडे देखील राज्याचं लक्ष लागलं होतं. याठिकाणी मनोज जरांगे पाटील हे महत्त्वाचे फॅक्टर ठरले आहेत. त्यामुळे बीडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते बजरंग सोनवणेंकडे आली ते विजयी झाले. मात्र पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) झालेला पराभव हा काही तरूणांच्या जिव्हारी लागला आहे.

पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी, दोघांनी केली आत्महत्या

बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडेंचा पराभव झाल्याने दोन मुलांनी आत्महत्या केली. पहिली आत्महत्या ही अंबेजोगाई येथील तरूणाने 9 जून रोजी केली. तर दुसरी आत्महत्या ही मंगळवारी करण्यात आली होती. पोपट वायभासे असं त्या तरूणाचं नाव आहे. यावर आता पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) हात जोडून विनंती केली आहे.

पंकजा मुंडेंचा व्हिडीओ व्हायरल

पंकजा मुंडेंनी ट्विट करत एक व्हिडीओ पोस्ट करत युवकांना हात जोडून विनंती केली. असं जीव देऊन चालणार नाही माझ्या बाळांनो, मग मी कसं काम करू? मी तुम्हाला हात जोडून विनंती करते. मी तुमच्याकडे यायले, पण माझा पायचं उचलत नाही, कृपा करून तुम्हाला माझी शपथ आहे. स्वत:च्या जीवाला काही करून घेऊ नका, असं म्हणत पंकजा मुंडेंनी ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला.

“नमस्कार…काय बोलू, मी तुमच्या सर्वांशी हे मला काळत नाही. मी आवाहन केलंय, माझं आवाहन तुमच्या दुखाच्या, नैराश्याच्या पलीकडे जात आवाहन पोहचत आहे की काय? असं मला वाटतंय. गेल्या काही दिवसांमध्ये तरूणांनी आत्महत्या केल्या आहेत, ज्यामुळे मी जितकी खचलीये तितकी माझ्या व्यतिरिक्त इतर कोणी खचलं नसेल”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

“मी अहमदपूरमधील युवकाच्या आईसोबत बोलले तेव्हा ती माऊली म्हणाली की, ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्याचा तुमच्यावर जीव होता. इतकं प्रेम याला आता मला शब्द सापडत नाहीयेत. कदाचित त्याला अघोरी प्रेम म्हणतात, जे तुम्ही माझ्यावर करत आहात. प्रत्येकक्षणी एक-एक कर्ज तुम्ही माझ्यावर चढवत आहात. तुम्ही मला पाहिलंय. गेल्या 20-22 वर्षात पहाडासारख्या मुंडेसाहेबांसारख्या नेत्याला मी भावनिक होताना पाहिलं आहे. खचताना पाहिलं आहे, त्यांना मी आधार दिला आहे.

मी त्यांना आधार देण्याइतपत मोठी नाहीये, पण मी त्यांना आधार देण्याचा भाव आणला आहे. कारण त्यांना वाटायला नको की मी मुलगी आणि खूप कोमल आहे. नाही बाबा मी खूप कठिण आहे, मी खूप कर्मठ आहे. मी तुमच्यासाठी लढायला मागे हटणार नाही”, असं पंकजा मुंडेंनी ट्विटच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर केला आहे.

News Title – Pankaja Munde Request To Peoples About Don’t Suicide

महत्त्वाच्या बातम्या

“उद्या 5 वाजेपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा…”; मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम

‘निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ’; रूपाली ठोंबरे पक्षात नाराज?

पुणे हिट अँड रन प्रकरणी माजी गृहमंत्र्यांना मिळाली अत्यंत धक्कादायक माहिती

अजितदादाने राज्यसभेसाठी घरातल्याच चेहऱ्याला दिली संधी; या नावावर शिक्कामोर्तब

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! फळपिक विम्याची मुदत राज्य सरकारने वाढवली