बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

यापुढे समाजसेवक म्हणून काम करणार- पंकजा मुंडे

औरंगाबाद |  मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून लाक्षणिक उपोषणाची हाक देण्यात आली आहे. यावेळी बोलताना पंकजा यांनी मराठवाड्याच्या प्राणी प्रश्नावर भाष्य केलं.

मराठवाड्याच्या प्रश्नांवर तोडगा निघायला हवा. मराठवाड्यासमोर अनेक प्रश्न आहेत. वेळोवेळी आपल्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे यापुढे मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी समाजसेवक म्हणून काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मी भाजप नेत्या आहेच. पण लोकांमध्ये जाऊन काम करणं महत्वाचं आहे. मला लोकांच्या मनात राहायचं आहे, इतर कोणतीही जागा माझ्यासाठी प्रिय नाही, असं पंकजा म्हणाल्या. तसेच सरकारवर आत्ताच टीका करणार नाही. कारण या सरकारला येऊन जेमतेम 100-120 दिवस झाले आहेत, असंही त्या म्हणाल्या आहेत.

पक्ष सोडण्याच्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पंकजांनी कार्यकर्त्यांना केलं. तसेच उपोषणाला उपस्थिती लावलेल्या भाजन नेत्यांचे त्यांनी आभार मानले. दरम्यान, उपोषणाला देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी उपस्थिती लावली होती.

टेंडिंग बातम्या-

मला हिंदूहृदयसम्राट म्हणून संबोधू नका; राज ठाकरेंच्या सूचना

“हवं तर क्रेडिट घ्या, योजनांचे नावही बदला, पण मराठवाड्यावर अन्याय करु नका”

महत्वाच्या बातम्या-

अरे बाबा थांब…नाही तर एखादा पैलवान आपल्याला चितपट करेल- अजित पवार

इतिहास अमित शहांसारख्या जनावरावर थुंकेल; अनुराग कश्यपची जहरी टीका

देवेंद्र फडणवीसांसमोरच भाजप पदाधिकाऱ्याची शेतकऱ्याला धक्काबुक्की!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More