बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बहुजन आधीच उपाशी, त्यात…”; मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे संतापल्या

औरंगाबाद | राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर राजकारण चांगलंच तापताना दिसत आहे. महाविकास आघाडी सरकार हे ओबीसी आरक्षण विरोधी आहे, असा आरोप भाजपकडून सातत्याने राज्य सरकारवर केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने औरंगाबादमध्ये ओबीसी आरक्षण मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्यात बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

‘आधीच उपाशी आणि त्यात उपवास’ अशी राज्यातील बहुजनांची अवस्था झाली आहे. गावांंमध्ये अजून सुद्धा जातीच्या भिंती आहेत, त्या अद्याप संपुष्टात आलेल्या नाहीत. आज महाराष्ट्रात ओबीसींची आणि बहुजनांची अशी परवड का?, असा खडा सवाल पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. राज्य सरकारवर यासंदर्भात भाष्य करताना त्यांचा चांगलाच संताप दिसून आला.

बहुजन म्हणजे कोण? जो बहू आहे संख्येने तोच बहुजन ना? बहुजनाची व्याख्या काय? बहुजनाची मूळ व्याख्या अशीच आहे, जो बहुजन आहे तो बहू. जो जास्त संख्येने आहे तो बहुजन आहे. ज्यास नोकरी नाही मिळाली तो बहुजन आहे. तसेच ज्याला आरक्षण नाही मिळालं तो बहुजन आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आजही राज्यातील गावांमध्ये लोकांवर जातीपातीच्या नावाखाली अत्याचार होत आहेत. शेतकरी, शेतमजूर आणि महिलांवर अत्याचार होत आहेत. ज्या लोकांवर अत्याचार झाला आहे आणि ज्यांनी केलेला आहे, त्याकडे त्याची जात पाहून आमच्यासारखे नेते जातात, ही लाजीरवाणी बाब आहे, अशी खंत देखील पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

थोडक्यात बातम्या –

देश अंधारात जाण्याची भीती!; राज्य सरकारची मोदींवर जोरदार टीका

सुसाट सुटणार गाड्या… महामार्गावरील ‘हा’ नियम लवकरच बदलणार!

रवी राणांची आमदारकी जाणार?, रवी राणा म्हणतात…

…जेव्हा नितीन गडकरी सामान्य माणसाप्रमाणे रांगेत उभे राहतात; पाहा व्हिडीओ

अजित पवारांच्या आदेशानंतरही महाविद्यालयं उघडली नाहीत, कारण…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More