बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तुम्हीही राष्ट्रवादीत या”; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची पंकजा मुंडेंना ऑफर

जळगाव । भाजपकडून (BJP) सुडाचं राजकारण करत गोपीनाथ मुंडेंच्या कन्या भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) पराभव करण्यात आला, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले. राज्यपाल लवकरच 12 आमदारांची यादी मंजूर करतील, असेही ते म्हणाले.

या 12 आमदारांच्या यादीत पंकजा मुंडेंचं नाव नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीमध्ये येण्यास सांगितलं आहे. ‘रोहिणी खडसे आल्या, आता तुम्हीही राष्ट्रवादीत या ‘अशी थेट ऑफरच मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना दिली आहे.

तसेच अजित पवारांचा (Ajit Pawar) जर पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली नसती. असंही मिटकरी यांनी म्हटलं.  मिटकरींच्या या दाव्यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More