बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

झारीतले शुक्राचार्य कोण आहे? म्हणत पंकजा मुंडे उसतोड कामगारांच्या प्रश्नावर आक्रमक

बीड |  महाराष्ट्रात सगळीकडे लॉकडाऊन असताना अनेक मजूर गावोगावी अकडले आहेत. त्यांना सुखरूप त्यांच्या घरी आणण्यावरून पंकजा मुंडे आक्रमक झाल्या आहेत. त्यांना घरी आणण्याबाबत विचार आणि निर्णय देखील झाला असताना झारीतले शुक्राचार्य कोण आहे? म्हणत पंकजा मुंडे यांनी सरकारवर टीका केली आहे.

ऊसतोड मजुरांचा निर्णय तात्काळ घ्या. त्यांचा संयम सुटू नये याची काळजी घ्या असं सांगत ते एका ठिकाणी 15 दिवस आहेत. एकही साधा शिंकला नाही मग काय चिंता आहेत्यांना घरी पाठवण्याबाबत?? असा सवाल त्यांनी केला आहे. तसंच त्यांना पाठवण्याचा निर्णय जवळपास नक्की असताना कोण झारीतले शुक्राचार्य?, आम्हाला श्रेय ही नको पण निर्णय करा. हा विषय राज्याच्या अधिकारात आहे, असं त्या म्हणाल्या आहेत.

घर सोडून जे परगावी आहेत जे ठणठणीत आहेत ते ही तिकडे आजारी पडतील. 5000 ते 8000 लोक एका ठिकाणी आहेत. एक-दोन ठिकाणी पाऊस पडला त्यांना काही झालं तर कोण जबाबदार ?? रँडम टेस्ट करा हवं तर पण तात्काळ म्हणजे आज उद्याच निर्णय व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, परगावी असलेल्यांना गावात जर आणलं तर त्यांना आयसोलेटेड करता येईल. त्यांचे लेकरं आईबाप गावी एकटे आहेत. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर गावी आणण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी शासनाला केली आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

मुंबईचं इटली होणार, आपल्याला खंबीर नेतृत्वाची गरज- रंगोली चंडेल

भारतात वटवाघळामुळे कोरोना पसरला का? ICMR चे संशोधक म्हणतात…

महत्वाच्या बातम्या-

पाकिस्तानने भारताकडे मागितला मदतीचा हात; ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पुरवण्याची केली विनंती

मला माफ करा मी हरलो; जितेंद्र आव्हाड यांची भावनिक फेसबुक पोस्ट

‘WHO’ला पाठवला जाणारा निधी तात्पुरता थांबवा; ट्रम्प यांचा प्रशासनाला आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More