‘आयाराम गयाराम जय श्रीराम…’ घोषणेने पंकजा चिडल्या; म्हणाल्या पराभवामुळे त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय
मुंबई | राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशाला आजपासून सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाच्या सुरुवातीच्याच दिवशी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
राधाकृष्ण विखेंना उद्देशून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी ‘आयाराम गयाराम जय श्रीराम’ अशा जोरदार घोषणा दिल्या. यावरच ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांना सुनावलं आहे.
पराभवामुळे त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय. फक्त विरोधाला विरोध म्हणून हे सगळं चालू आहे, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.
दरम्यान, विरोधकांनी पहिल्याच दिवशी दुष्काळ, हमीभाव मुद्दे उचलून आंदोलन केले आहे.
महत्वाच्या बातम्या
-विखे पाटील समोर दिसताच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिल्या घोषणा; ‘आयाराम गयाराम जय श्रीराम’
-मुख्यमंत्री विधानसभेत येताच विरोधकांची घोषणाबाजी; ‘आले रे आले चोरटे आले’!
-भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवल्यानंतर शोएब अख्तर चिडला; म्हणाला आमचा कॅप्टन बिनडोक आहे
-शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या तर ते पाप फडणवीस सरकारचं- अजित पवार
-मनसेची राधाकृष्ण विखेंवर बोचरी टीका; ‘स्वार्थही ओशाळला असेल’…
Comments are closed.