ठाकरे सरकारमधील मंत्रीच बेशिस्त, ते इतरांना काय शिस्त लावणार- पंकजा मुंडे
मुंबई | जळगावमधील वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याची धक्कादायक घटना घडली. यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.
ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनाच शिस्त नाही, ते इतरांना काय शिस्त लावणार?, असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला. पंकजा मुंडे यांनी बीड जिल्हा सहकारी बँक, महिलांवरील अत्याचार आणि जळगावमधील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.
राज्यात अरेरावी सुरू आहे. जळगावातील घटनेत पोलीस अधिकारीच असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. राज्यात चाललंय तरी काय? ज्या राज्यातील सत्तेतील लोकच आपल्या प्रतिमेचं पोषण करू शकत नाही. तेच जर अन्याय करणारे असतील तर दुसऱ्यांना काय शिस्त लागणार आहे?, असं पंकजा मुडेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, जळगाव घटनेतील संबंधितांना निलंबित करा आणि मगच चौकशी करा, अशी मागणीही यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी केली आहे. या घटनेमध्ये राज्यपालांनीही लक्ष घालावं, अशी विनंती पंकजा मुंडे यांनी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
#उद्धव_माफी_माँगों ट्विटरवर हा हॅशटॅग का होतोय ट्रेंड? जाणून घ्या!
पुणेकरांनो सावधान! ‘कोरोना’ शहरात फोफावतोय, पाहा आजची आकडेवारी
विधानसभेत आज एक ‘कॉमेडी सम्राट’ पाहिला- नितेश राणे
“दारू पिऊन जीवे मारण्याच्या धमक्या देण्यातच बलात्काऱ्यांच्या समर्थकांचा पुरूषार्थ उरला आहे का?”
…म्हणून महिला पोलिसाने दिली आपल्या पतीची सुपारी
Comments are closed.