बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चुकून तुम्ही सत्तेत आलात, भविष्यात जनता तुम्हाला दारातही उभं करणार नाही- पंकजा मुंडे

पुणे | ओबीसींचं राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं या विरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमिवर राज्यभर आज चक्काजाम आंदोलन सुरु झालं. पुण्यात पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे.

सरकारला मला सांगायचंय की एवढं छोटं मन ठेऊन तुम्ही मोठे होऊ शकत नाहीत. चुकून तुम्ही राजकारणात आलात. भविष्यात जनता तुम्हाला दारात देखील उभं करणार नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

या सरकाने 15 महिने फक्त कोर्टाकडून तारखा घेतल्या. इम्पेरिकल डाटाच्या आधारावर आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी सरकारने डाटा तयार करण्यास सांगण्यात आलं. पण सरकारने कोणताही डाटा तयार केला नाही. यांनी जाऊन कोर्टात स्वीकारलं की ओबीसीला जास्त आरक्षण दिलंय. कोर्टानं त्याच दिवशी आरक्षण रद्द केलं आणि 50 टक्क्यांच्या वरची लढाई सुरू असताना ५० टक्क्यांच्या आतलं आरक्षणही संपुष्टात आलं. या सरकारला लाज वाटली पाहिजे, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केलीये.

देवेंद्रजी म्हणाले तुम्हाला काही जमत नसलं तर आम्हाला सांगा. असंही तुम्हाला काही जमत नाहीये. जेव्हा मी माठाची तिपई बघते, तेव्हा मला आत्ताचं सरकार दिसतं. सगळे आंदोलन गार करण्यासाठी हे तिपईचं सरकार आहे. त्यावरच्या मटक्यावर सगळे आंदोलनं गार करणं हे सरकारचं कर्तव्य दिसतंय, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या- 

ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या प्रविण दरेकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात!

‘बघून घेऊ’, अनिल देशमुखांवरच्या कारवाईवर संजय राऊतांचं रोखठोक उत्तर

बियाणे, युरिया यांची कृत्रिम टंचाई करणार्‍यांवर पेरणीचा हंगाम संपल्यावर कारवाई करणार का?- रणजित बागल

ओबीसींचं राजकीय आंदोलन रद्द होणं हे ठाकरे सरकारचं पाप आहे- अशिष शेलार

“मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा बंदीराष्ट्र बनवू पाहतायत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More