बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…म्हणून ओबीसी आरक्षण धोक्यात आलंय”; पंकजा मुंडेंची घणाघाती टीका

मुंबई | ओबीसी आरक्षणाच्या दृष्टीनं सर्वोच्च न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. इम्पेरिकल डाटासाठी ठाकरे सरकारच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे सरकारला केंद्र सरकारकडून आता ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक इम्पेरिकल डाटा मिळणार नाही. परिणामी सध्या राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारकडून इम्पेरिकल डाटामध्ये अनेक त्रुटी असल्याचं सांगण्यात आलं. त्यांचं हे म्हणणं न्यायालयानं खर ठरवत राज्य सरकारला डाटा गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी सध्या राज्यात महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा जोरदार सामना रंगला आहे. राज्याच्या माजी मंत्री ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांनी यावरूनच ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

सरकारचे अज्ञान, अहंकार आणि दुर्लक्ष या कारणांमुळं ओबीसी आरक्षण धोक्यात आलं आहे. सरकारच्या मंत्र्यांमध्येच समन्वय नाही, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे. राज्य सरकारनं लवकर अधिेवेशन बोलावून डाटा गोळा करण्याचे आदेश द्यावेत. राज्यातील ओबीसी समाजावर ठाकरे सरकार अन्याय करत आहे, अशी टीकाही मुंडे यांनी केली आहे.

दरम्यान, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न आता गंभीर बनत चालला आहे. ठाकरे सरकारच्या अडचणीत आता मोठी वाढ होणार आहे. भाजकडून सरकारवर सातत्यानं आरक्षणविरोधी असल्याची टीका होत आहे. अशात ठाकरे सरकार काय भूमिका घेत हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या 

“अजित पवारांनी माफी मागून राजीनामा द्यावा”

“पंतप्रधानांचं सोडा, अर्थमंत्र्यांनाही अर्थशास्त्र कळत नाही, दोघंही घमेंडी”

“कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, त्यांची छटाकभर लायकी मात्र…”

रुपाली पाटील ठोंबरेंचं ठरलं, राष्ट्रवादीतच जाणार?; हे आहेत स्पष्ट संकेत

फडणवीस म्हणतात, “…तर आज ओबीसी आरक्षण गमावण्याची वेळ आली नसती”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More