बीड | भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या भाजर्डी गावात नारळी सप्ताहाच्या निमित्ताने पंकजा मुंडे (Pankaja Munde) -धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि नामदेवशास्त्री एकत्र आले होते. कार्यक्रम धार्मिक होता पण तिघेजण खूप दिवसांनी एकत्र आल्याने चांगलीच शेरेबाजी रंगल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यासोबत काही वैर नाही, असंही म्हटलं.
धनंजय मुंडे यांनी देेखील पंकजाताई आणि माझ्या वाद नसल्याचं सांगितलं. राजकारणात आम्ही कितीही दूर असलो तरी ताई येथे ताई माझ्याजवळ आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
एकदा पंकजा म्हणाल्या होत्या, मी भगवान गडाची पायरी आहे. असे असेल तर मी त्या पायरीचा दगड आहे, असं धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना म्हटलंय.
दरम्यान, माझ्या सभा मोठ्या होत नाहीत. पंकजा ताईंच्या सभा मोठ्या होतात. भगवान गडासाठी जे काही करता येईल, ते आम्ही दोघे नक्की करू, असंही ते म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-