महाराष्ट्र मुंबई

स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचं स्मारक बनवू नका- पंकजा मुंडे

मुंबई  | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे जाऊन मी गोपीनाथ मुंडेंचं स्मारक करू नका अशी मागणी करणार आहे, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. त्या मुंबईमध्ये एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होत्या.

मी गोपीनाथ मुंडेचं स्मारक करा अशी मागणी केलेली नाही. एखाद्या रेल्वे किंवा बिल्डींगला मुंडेंचं नाव द्या, असंही म्हटलं नाही. अनेकजण ठिकठीकाणी पुतळे उभे करतात मी त्यांनाही रागावते. फक्त साहेबांचे विचार जिवंत ठेवा, असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे.

गोपीनाथ मुंडे तेव्हाच जिवंत राहतील. जेव्हा त्यांचे विचार जिवंत राहतील. म्हणून मी उद्धव ठाकरेंना विनंती करणार आहे की आता स्मारक अजिबात करू नका. जर सरकारच्या माध्यमातून स्मारक करायचं असतं तर मी गोपीनाथ गड बनवला नसता, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.

दरम्यान, मी माझं स्मारक बनावलं आहे. ते म्हणजे गोपीनाथ गड. ते एकमेव स्मारक आहे जे मी स्वत: बनवलं आहे.  देशात अशी एकच मुलगी असेल की जिने कोणाकडेही न मागता वडिलांचं स्मारक स्वत: बनवलं, असंही पंकजा मुंडें म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या