बीड | आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या कर्माची फळं मिळत असतात. आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. आपण माणूस म्हणून जन्म घेतला असल्याने आपल्या समोर काही आदर्श असतो आणि तो आदर्श बघून आपणही आदर्श निर्माण करतो, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त तिथे आज महापूजेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.
खूप बलिदान करावं लागतं. खूप कठीण परिस्थीतून जगावं लागतं. तेव्हा लोकं त्यांच्या मृत्यूनंतर वर्षोंवर्ष त्यांची आठवण काढतात. मग ते नेते असतील किंवा संत. असंच गोपीनाथ मुंडे यांची आठवण आजही आपल्या डोळ्यांसमोर आहे. खूप कष्ट करावे लागतात. ते कष्ट समाजाला समर्पित करावे लागतात, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
माणसाचा जन्म काहीतरी करुन दाखवायचं आहे. परोपकाराने काम करायचं. संस्काराने काम करायचं. क्षमा ज्याच्या मनामध्ये आहे, त्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची वासना कधीही जागा ठेवू शकत नाही, असं पंकजा म्हणाल्या.
थोडक्यात बातम्या-
“‘रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते, भाजप नाही”
मायदेशातील कसोटीत पहिला बळी घेत बुमराहने केला श्रीगणेशा, पाहा व्हिडीओ
आर. आर. पाटलांच्या पोलिस बंधूंचा अजित पवारांच्या हस्ते सत्कार; अजित पवार भावूक, म्हणाले
काँग्रेस हायकमांडने प्रणिती शिंदेंवर सोपवली ‘ही’ नवीन जबाबदारी
‘मराठ्यांसह ‘यांनाही’ आरक्षण द्या’; रामदास आठवलेंची मागणी