बीड महाराष्ट्र

पंकजा मुंडे संपल्या असं वाटणाऱ्यांनी ही जनसंपत्ती पाहावी- पंकजा मुंडे

बीड | निवडणुकीनंतर काही लोकांना वाटलं पंकजा मुंडे संपल्या. ज्यांना मी संपले असं वाटत होतं त्यांनी ही जनसंपत्ती जरूर पाहावी, असा टोला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधकांना लगावला आहे.

विजयादशमीच्या मुहुर्तावर आज सावरगाव घाट येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली मदत ही अपूरी अजून मी त्यांच्याकडे आणखी मदतीची मागणी करणार आहे असंही पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं आहे.

मला एवढ्या मोठ्या जमावासमोर बोलताना एक वेगळीच शक्ती अनुभवायला मिळते. ही सीमोल्लंघनाची परंपरा मुंडे साहेबांपासून चालत आलेली आहे. भक्ती आणि शक्तीचा अद्वितीय संबंध देशात फारच कमी ठिकाणी पाहायला मिळतो. गरीब आणि कष्टकरी समाज मोठ्या प्रमाणात एका ठिकाणी येतो, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

ऑफिस अन् हनुमानाचा फोटो ट्विट करत कंगणाचं संजय राऊतांवर टीकास्त्र; म्हणाली…

मुंबई महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार- संजय राऊत

सण साजरे करताना जवानांची आठवण ठेवा, त्यांच्यासाठी दिवा लावा- नरेंद्र मोदी

“…तर राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष होण्यास उशीर लागणार नाही”

कोरोना लसीचं राजकारण करण्याइतके मुख्यमंत्री कोत्या मनाचे नाही- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या