बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पुजा चव्हाण माझ्या मतदारसंघातील तरुणी, तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे”

मुंबई | परळीची असलेल्या पुजा चव्हाणनं गेल्या रविवारी मध्यरात्रीनंतर पुण्यात आत्महत्या केली आहे. ही घटना महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत घडली आहे. पुजा चव्हाणनं विदर्भातल्या एका मंत्र्यासोबतच्या प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा होती. यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरुणी आहे. तिच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्काच बसला. तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.

पुजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणी भाजपच्या महिला नेत्या आणि आघाडी आता आक्रमक झाली आहे. पुजाच्या आत्महत्येला कारण ठरलेल्याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

प्रेमाच्या आठवड्यात त्यानं मृत्यूला कवटाळलं, प्रेयसीबद्दल लिहिल्या धक्कादायक गोष्टी

“…म्हणून राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला”

अन् भर संसदेत सुप्रिया सुळे म्हणाल्या…’निर्मलाताई, माझ्या दादाकडून अर्थखातं शिका’

आता जनताच या तिन्ही पक्षांची घमेंड उतरवेल- आशिष शेलार

राज्यपाल आणि ठाकरे सरकारच्या वादात आठवलेंची उडी, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More