अमरावती औरंगाबाद महाराष्ट्र

कोयत्याला न्याय मिळेल, ऊसतोड कामगारांनी विश्वास ठेवावा- पंकजा मुंडे

बीड | कोयत्याला न्याय मिळेल. ऊसतोड कामगारांनी विश्वास ठेवावा, असं आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलंय. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अनेक वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.

आपल्या कोयत्याला सन्मान नक्कीच मिळेल. तथापि, कोयत्याची धार आणि सन्मान सांभाळण्याची जबाबदारी ऊसतोड कामगार आणि मुकादमांवर देत आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

माझ्या ऊसतोड मजूर बांधवांच्या न्याय्य मागण्यांसाठी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, जेष्ठ नेते खासदार शरद पवार, कारखानदारांचे प्रतिनिधी नामदार जयंत पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी विश्वास ठेवावा, असंही पंकजा मुंडे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

“70 वर्षांत जे काही उभं केलं होतं, ते सगळं हे विकून टाकणार”

कंगणा राणावतला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा!

‘मी सुशांत सरांना गांजाचं सेवन करताना पाहिलं होतं’; नोकर दीपेशचा खुलासा

अखेर ‘एमपीएससी’कडून परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर

‘मला महाराष्ट्र आवडतो’; कंगणा राणावतचं मराठीत ट्विट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या