महाराष्ट्र मुंबई

प्रत्येक गोष्टीसाठी लढणाऱ्या महिलांना कधीही कमजोर समजू नका- पंकजा मुंडे

मुंबई | प्रत्येक गोष्टीसाठी लढणाऱ्या महिलांना कधीही कमजोर समजू नका. राष्ट्रीय स्तरावर फक्त दोन टक्के महिला राजकारणात आहेत. एकीकडे जागतिक पातळीवरील राजकारणात कित्येक देशात महिलांना 52 टक्के आरक्षण दिलं गेलं. पण आपल्याकडे अजून या गोष्टीवर संपूर्णपणे विचार झालेला नाही, तो व्हायला हवा, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे आयोजित कार्यक्रमात  पंकजा मुंडे बोलत होत्या.

भविष्यात अनेक गोष्टींसाठी महिलांना सामना करावा लागणार आहे. त्यासाठी त्यांनी राजकारणात प्रवेश करावा. अधिकारासाठी लढणाऱ्या महिला खूप आहेत, पण ज्यांच्या हातात शक्ती आहे. अशा महिला खरंच लढत आहेत का? हा एक प्रश्नच आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आर्थिक व संरक्षण विभागाच्या महत्त्वपूर्ण मंत्रिपदाचे सूत्र महिलांच्या हातात दिले आहे. तसेच 6 महिलांच्या खांद्यावर केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी दिली असून त्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. या देशाचे लोकसभा अध्यक्षपद, मुख्यमंत्री, मंत्री अशा विविध पदांवरांची जवाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली आहे, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

नवाब मलिक मंत्री आहेत म्हणून जावयाने काहीही करावं का?- सुधीर मुनगंटीवार

कृष्णा हेगडेंच्या आरोपांनंतर रेणू शर्मानं मौन सोडलं; केला मोठा खुलासा

धनंजय मुंडेच नव्हे तर ‘या’ व्यक्तिविरोधातही रेणू शर्मानं तक्रार केल्याचं उघड

धनंजय मुंडे प्रकरणात आता व्हिडीओ क्लिप्स; पीडितेच्या वकिलाचा धक्कादायक दावा

…तर माझाही धनंजय मुंडे झाला असता; ‘या’ मनसे नेत्याचा धक्कादायक गौप्यस्फोट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या