Top News महाराष्ट्र मुंबई

मोदींनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले, आंदोलनात राजकारण येऊ नये- पंकजा मुंडे

मुंबई | केंद्राच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी आझाद मैदान येथे दाखल झाला आहे. या मोर्चाला आघाडीतील नेत्यांनी पाठींबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडेंना प्रश्न विचाण्यात आल्यावर त्यांनी सावध भूमिका घेतली.

केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचंच सरकार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतले आहेत आणि आताही सरकार शेतकऱ्यांशी चर्चेची तयारी दाखवत असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

बळीराजाचा हा देश आहे, मोदींनी पीक विम्याचा, हमीभाव, शेतकऱ्यांना पेन्शन द्यायचा असे महत्त्वाचे निर्णय घेतले. सरकार सकारात्मक चर्चेसाठी तयार आहे. दोन्ही बाजूंनी सकारात्म चर्चा झाल्यास नक्कीच तोडगा निघणार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.

दरम्यान, महाराष्ट्रात आंदोलन पोहोचायला तीन महिने का लागले, हा साधा प्रश्न आहे. शेतकरी बाजूला न राहता या आंदोलनात राजकारण येऊ नये, हा प्रयत्न सर्वांचाच असायला पाहिजे असल्याचं पंकडा मुंडे म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या-

“राज्य सरकारातला एक मंत्री जिरवायची भाषा करतो हे योग्य नाही”

पॉर्न पाहात असला तर सावधान; पुढचे काही दिवस सतर्क राहा, नाहीतर…

निर्वस्त्र न करता छातीला स्पर्श करणे लैंगिक अत्याचार नव्हे; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

वडेट्टीवारांची वादग्रस्त वक्तव्ये अन् रोहित पवार म्हणतात, ओबीसींमध्ये अपप्रचार करणाऱ्याला शोधलं पाहिजे!

धनंजय मुंडेंवरील बलात्काराच्या आरोपांवर पंकजा मुंडे पहिल्यांदाच बोलल्या, म्हणाल्या…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या