बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजित पवार कुठल्या राजकीय बुद्धीने काम करत आहेत कळत नाही- पंकजा मुंडे

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. वैधानिक विकास महामंडळाच्या पुनर्स्थापनेचा विषय विधिमंडळावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून सभागृहात गोंधळ झालेला पाहायला मिळाला. यानंतर विरोधी पक्षनेते यांनी अजित पवारांवर टीका केली. अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडेंनीही यावरून अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

वैधानिक विकास महामंडळ किंवा मराठवाड्याचा विकास आणि ‘त्या’ 12 आमदारांचा संबंध काय?, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हे वक्तव्य दुर्देवी आहे. कुठल्या राजकीय बुद्धीने काम करत आहेत कळतच नाही, असं म्हणत पंकज मुंडेंनी अजित पवारांवर टीका केली. मुंबईमध्ये त्या बोलत होत्या.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? इतके दिवस झाले तरी सरकार निर्णय का घेत नाही?, असा सवाल भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, विकास महामंडळ आम्ही स्थापन करू. बजेटमध्ये मी तसा निधी देईन. ज्या दिवशी राज्यपाल 12 आमदारांची नावं जाहीर करतील, त्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करू. त्यानंतर विरोधी पक्षनेते यांनी पवारांवर टीका केली.

दरम्यान, अजित पवार जे तुमच्या पोटात होतं ते ओठावर आलं. 12 सदस्यांसाठी विदर्भ आणि मराठवाड्याला ओलीस धरणं योग्य नाही. मराठवाड्यातील लोक हे कधीही सहन करणार नाही. राज्यपाल आणि तुमचं जे काही सुरू आहे. त्याच्याशी या सभागृहाला काहीही घेणं देणं नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

सावधान! पुणे जिल्ह्यात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय; पाहा सविस्तर आकडेवारी

“हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही म्हणून मोदींनी ख्रिश्चन परिचारिकेकडून लस घेतली”

बाबो! खेळाडूने हवेत उडी घेत पकडला अफलातून कॅच, पाहा व्हिडीओ

“इंधन दरवाढीच्या मुद्द्याला बगल देण्यासाठी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी”

‘मुंबईतील त्या दिवशीच्या ‘बत्तीगुल’मागे चीनचा हात?’; ऊर्जा मंत्र्यांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More