Top News औरंगाबाद

गुंडांचं आत्मबल वाढवणारं पालकत्व आमच्या बीडला मिळालं हे दुर्दैव- पंकजा मुंडे

Loading...

बीड | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीमध्ये दिवसाढवळ्या एका व्यापाऱ्याला काठीने बेदम मारहाण करत असल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे परळीत बंद पुकारला होता. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.

परळीत गुंडागर्दी, हफ्तेखोरी, माफिया राज करायचं आणि पोलिसांनी कर्तव्य बजावल्यावर, गुन्हे दाखल झाल्यावर मग ‘गय करणार नाही ‘अशी भाषा करायची. हे दुटप्पी धोरण गुंडांचं आत्मबल वाढवणारं पालकत्व आमच्या बीडला मिळालं हे दुर्दैव…हे खपवून घेतलं जाणार नाही, असं ट्विट करत पंकजा मुंडे यांनी आगपाखड केली आहे.

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात परळी येथे व्यापारी आणि सामान्य जनतेवर अन्याय जनतेने केलेलं बंद ही परिस्थिती तर छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली होत असल्याचंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, परळी येथील व्यापारी आणि अन्य काही जणांमध्ये आपसात झालेल्या वादातून मारहाण करण्यात आल्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करून 24 तासांच्या आत त्यांना अटक करण्यात आली आहे. अशा प्रकरणात कोणाचीही गय करणार नसल्याचं धनंजय मुंडें यांनी म्हटलं आहे.

 

Loading...

 

ट्रेंडिंग बातम्या-

इंदोरीकरांच्या वादावर सिंधूताई सपकाळ यांची मोठी प्रतिक्रिया

इंदोरीकर महाराजांच्या तोंडाला काळं फासू- तृप्ती देसाई

महत्वाच्या बातम्या-

“भारत-पाकिस्तान एकमेकांचे कांदे, बटाटे खाऊ शकतात मग क्रिकेट सामना खेळायला नकार का?”

विनोदाचार्य निर्माण होणे ही कीर्तन परंपरेची अधोगती- सदानंद मोरे

माफी मागितली तरी इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल व्हायला हवा- तृप्ती देसाई

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या