बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शहा’; पंकजा मुंडेंचा फडणवीसांवर निशाणा???

मुंबई | केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांनी यांची वर्णी लागणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं. त्यामुळे पंकजा मुंडे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यासोबतच काही पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामेही दिले होते. संबंधित पदाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडेंची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

माझा नेता नरेंद्र मोदी, माझा नेता अमित शहा, माझा नेता जे.पी. नड्डा आहेत. त्यांच्या मनात माझ्याबद्दल चांगले विचार आहेत, असा मला विश्वास आहे. आपण कष्टाला घाबरत नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांनी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता अप्रत्यक्ष निशाणा साधल्याच्या चर्चांणा राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

तुमचं पद मला प्रीतम ताईंच्या मंत्रिपदापेक्षा जास्त महत्वाचं आहे. आपलं घर आपण सोडायचं नाही. पंतप्रधान मोदींसाठी घोषणा द्या. त्यांना ऐकू जाईल एवढं मोठ्यांनी घोषणा द्या. माझ्या माणसांचे तुकडे पाडण्याचे अनेक प्रयत्न केले, पण ते सफल होऊ देऊ नका, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी समर्थकांना केलं.

दरम्यान, कौरव आणि पांडवांचं युद्ध थांबवण्याचा प्रयत्न पांडवांनी केला. मग मी कोण आहे? माझी इच्छा आहे की, धर्मयुद्ध टळावं, कारण माझे सैनिक आडवे असून धारातीर्थी पडत असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या- 

मंत्रालयात खळबळ! एकनाथ खडसेंना क्लीन चीट देणारा ‘तो’ अहवाल गायब

“नानांनी त्या विषयाला फार गांभिर्याने घेऊ नये”

“मी सर्व कार्यकर्त्यांचे राजीनामे नामंजूर करत आहे; मोठा नेता नेहमी त्याग करतो”

…म्हणून पुढील दोन-तीन दिवसात टाळेबंदीचा निर्णय घेतला जाईल – किशोरी पेडणेकर

वर्ल्डकप चॅम्पियन ‘यशपाल शर्मा’ यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More