बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एका मंत्र्याच्या राजीनाम्याची एक निर्णयाची पायरी ओलांडली आता…- पंकजा मुंडे

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये अडचणीत आलेले शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. भाजपने हे प्रकरण लावून धरत राठोडांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. राठोडांनंतर आता भाजपने राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या अशी मागणी केली आहे. अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडेंनीही नाव न घेता धनंजय मुंडेंवरून सरकारवर तोफ डागली आहे.

एका मंत्र्याच्या राजीनाम्याची एक निर्णयाची पायरी उशिराने का होईना ओलांडली. आता निष्पक्षपातीपणे चौकशीचा डोंगर सरकारला ओलांडायचा आहे. सरकारच्या इतिहासात महिलांच्याबद्दल एवढा दुजाभाव आणि सामाजिक व्यवस्थेची इतकी दुरवस्था आपल्या महाराष्ट्राला शोभणारी नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

जे उद्धव ठाकरेंनी केलं ते शरद पवारांनीही करावं, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. पाटलांच्या या बातमीला रिट्विट करत पंकजा मुंडेंनी ट्विट केलं आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुडेंवर रेणू शर्मा नावाच्या तरूणीने बलात्काराचा गंंभीर आरोप केला होता. त्यावेळीसुद्धा भाजपने आक्रमक भूमिका घेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, काही दिवसांनंतर रेणू शर्माने आपली तक्रार मागे घेतली होती. तक्रार मागे घेतल्यावर हे प्रकरण शांत झालं. मात्र त्यानंतर संजय राठोड यांचं नाव पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात समोर आलं होतं. त्यासोबत सोशल माध्यमांवर काही फोटो आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने या प्रकरणात त्यांच्यासमोरील आणखी वाढत गेल्या. अखेर त्यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला.

 

थोडक्यात बातम्या-

“संजय राठोड यांच्या प्रेमापोटी लोक पोहरादेवीला आले, त्यांनी येऊ नका म्हटलं होतं”

…म्हणून चालू पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी केला राज ठाकरेंना नमस्कार

“संजय राठोडांचा राजीनामा घेतला म्हणजे महाराष्ट्रावर उपकार केले नाही”

पूजाच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, केली ‘ही’ विनंती

“संजय राठोडांनी माझ्याकडे राजीनामा दिला पण विरोधकांनी गलिच्छ राजकारण सुरू केलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More