Top News

सामाजिक न्याय मंत्री आहात तर न्याय करा अन्याय नाही; पंकजांची धनंजय मुंडेंना ताकीद!

बीड | सामाजिक न्याय विकास मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भाजपचं काम करत असल्यानं संबंधित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षाला मारहाण केल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यावर भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना ताकीद दिली आहे.

सत्ता नसली तरी पुण्याई आहे आणि हिंमतही आहे. सामाजिक न्याय मंत्री आहात तर न्याय करा अन्याय चालत नाही इथे, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

बीड जिल्ह्यातील शांतता आणि सुख कायम राहावं असं पालकत्व कोणाचं ही मिळावं मग ते कोणीही असो अशी भावना होती पण सूडाच्या आणि सत्तेच्या लालसेने ग्रासलेले लोक समाजात शांतता ठेऊ शकत नाही माझ्या कार्यकर्त्याला मारहाण, दबाव, दहशत हेच ध्येय दिसतंय पालकांचं …हे खपवून घेतलं जाणार नाही, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी केलेल्या टीकेला आता धनंजय मुंडे काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या