Pankaja Munde l लोकसभा निवडणुकीत बीड जिल्हा चांगलाच चर्चेत राहिला आहे. कारण बीड लोकसभा निडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. अशातच पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंकजा मुंडे राज्यसभेत जाणार? :
बीड लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या पंकजा मुंडे यांना आता राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता वर्तवली आहे. कारण भाजपच्या गोटात त्यादृष्टीने हालचाली देखील सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीत नुकतीच भाजपच्या दिग्गज नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात चर्चा झाली आहे.
राज्यसभेत पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले यांच्या जागा रिक्त आहेत. कारण ते लोकसभेवर निवडून आल्याने त्यांच्या राज्यसभेतील जागा रिक्त झाल्या असल्याने भाजपने निर्णय घेतला आहे. पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले यांच्या जागा रिक्त झाल्याने त्यापैकी एका जागेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. जर तसे घडले तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे निराश झालेल्या त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
Pankaja Munde l राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरु :
राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा जोरदार संघर्ष सुरु आहे. त्यामुळे ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्या, असा एक मतप्रवाह भाजपच्या राज्यातील नेत्यांमध्ये दिसत आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना राज्यसभेवर घेण्याची केंद्रीय नेतृत्वाला विनंती केल्याची माहिती समोर आली आहे.
बीड लोकसभेत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने तो पराभव समर्थकांच्या चांगलंच जिव्हारी लागला होता. कारण मुंडे समर्थक प्रचंड निराश झाले होते. याच नैराश्याच्या भरात बीड जिल्ह्यातील तब्बल 4 मुंडे समर्थक तरुणांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे या चारही कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत आहेत. तसेच आपल्या समर्थकांना आत्महत्या करु नका असे आवाहन देखील करत आहेत.
News Title : Pankaja Munde will go to Rajya Sabha
महत्त्वाच्या बातम्या
अदिती तटकरे होणार ‘या’ जिल्ह्याच्या नव्या पालकमंत्री
विधानसभेपुर्वी शिंदे सरकार महिलांना देणार मोठं गिफ्ट?, थेट बँक खात्यावर पैसे..
ग्राहकांना झटका! सोन्याचे भाव पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर
राज्यातील ‘या’ भागांना हवामान विभागाचा मोठा इशारा; ऑरेंज अलर्ट जारी
वट सावित्री पौर्णिमा का साजरी करतात? जाणून घ्या यामागचे कारण