आत्महत्या केलेल्या समर्थकाच्या अंत्यविधीवेळी पंकजा मुंडे ढसा ढसा रडल्या!

Pankaja Munde  | बीड लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे अशी लढत झाली. या लढतीत बजरंग सोनवणे हे केवळ 6 हजार मतांनी विजयी झाले आहेत. पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) हा पराभव बीडकरांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे आता बीडमध्ये आत्महत्येचं सत्र सुरू असलेलं पाहायला मिळत आहे.

पंकजा मुंडेंना रडू कोसळलं

बीड जिल्ह्यातील शिरुर-कासारच्या वारणी गावातील गणेश बडे या पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde) समर्थकाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. पंकजा मुंडे या अंत्यविधीवेळी वारणी गावात गेल्या होत्या. यावेळी पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) देखील रडू कोसळलं आहे.

याआधी पोपट वायबसे या व्यक्तीने आत्महत्या केली होती तेव्हा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंनी वायबसेंच्या घरी जात कुटुंबाचं सांत्वन केलं होतं. तेव्हा देखील पंकजा मुंडे (Pankaja Munde) भावूक झाल्या होत्या. बीड लोकसभा मतदारसंघ हा मुंडेंचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात भाजपचेे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडेंवर अनेक बीडकर प्रेम करत होते. आजही करतात. त्यानंतर माजी खासदार प्रीतम मुंडे देखील बीडकरांचा एकप्रकारचा श्वासच आहे. तर आता पंकजा मुंडेंवर देखील बीडकरांनी आपला जीव ओवाळून टाकला आहे.

दरम्यान, पंकजा मुंडेंनी घडलेल्या घटनेप्रकरणी कोणीही आत्महत्या करू नये, असं आवाहन केलं आहे. आपण केवळ 6 हजार मतांनी हारलो आहे. इतर ठिकाणी लाख लाख मतांचा फरक असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. तसेच पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी हा पराभव पुन्हा भरून काढेल. याच घडलेल्या घटनेवर मनसेचे प्रकाश महाजन यांनी पंकजा मुंडेंवर भाष्य केलं आहे.

तरूणांनी मुंडे घराण्यावर जीव ओवाळून टाकला

या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी मोठं भाष्य केलं आहे. बीड जिल्ह्यात मन सुन्न करणारी घटना घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत आपल्या नेत्याचा पराभव झाला म्हणून अनेकांनी आत्महत्या केली आहे. पंकजा मुंडे या लोकसभा मतदारसंघात पराभूत झाल्या म्हणून त्यांनी आत्महत्या केल्या. पण पंकजा मुंडेंचं राजकीय भविष्य काय? हे या आत्महत्येमागील कारण आहे. आत्महत्या केलेल्या तरूणांनी मुंडे घराण्यावर जीव ओवाळून टाकला आहे असं म्हणावं लागेल, असं प्रकाश महाजन म्हणाले आहेत.

मी काल पंकजा मुंडेंचा आक्रोश पाहू शकलो नाही. गोपिनाथ मुंडेसाहेब गेल्यानंतरही त्यांनी आक्रोश केला नाही. त्यांनी संयम ठेवला होता. त्यांनी धीराने कठीण प्रसंगांना तोंड दिलं होतं. मात्र आता पंकजा मुंडे या उन्मळून पडल्या होत्या, असं प्रकाश महाजन म्हणाले.

News Title – Pankaja Munde Worker Sacrifice In Beed Will Not Go To waste Marathi News

महत्त्वाच्या बातम्या

तरुणांनो बारमध्ये दारु पिण्यासाठी द्यावा लागणार हा पुरावा!

राज्यातील ‘या’ जिल्ह्याला यलो अलर्ट; तर इतर जिल्ह्यात कसे असणार वातावरण

ओबीसी समाज एकवटला; 57 लाख बोगस कुणबी नोंदी तातडीने रद्द करा,अन्यथा…

महाराष्ट्रात एनडीएला कमी जागा का मिळाल्या? रामदास आठवलेंनी केला मोठा दावा

…म्हणून महाविकास आघाडीला यश मिळाले; एकनाथ शिंदेंनी सांगितले कारण