बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘जर ते असते तर…’; झी मराठीच्या मंचावर पंकजा मुंडे भावूक, पाहा व्हिडीओ

मुंबई | झी मराठीवरील किचन कल्लाकार (Kitchen Kallakar) कार्यक्रम सध्या घरोघरी पोहचला आहे. कलाकारांना किंवा राजकिय व्यक्तींना कार्यक्रमात बोलावून त्यांचे कुकींग स्किल्स तपासले जातात. सध्या या कार्यक्रमाला तूफान प्रतिसाद मिळतं आहे. या कार्यक्रमात नुकतेचं कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde), आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) असे सर्व मंडळी दिसले आहेत.

कार्यक्रमादरम्यान पंकजा मुंडे वडीलांच्या आठवणीत भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. कार्यक्रमाचे होस्ट प्रशांत दामले यांनी पंकजा यांना आज जर साहेब असते. तर ते तुम्हाला काय म्हणाले असते? असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना पंकजा मुंडे भावनिक झाल्या. त्याचबरोबर त्यांच्या डोळ्यात अश्रूही तरळले होते.

पंकजा मुंडेनी यावेळी अश्रू पुसतचं उत्तर दिलं, ते प्रचंड नर्वस झाले असते. कारण जेव्हा मी परफॉर्म करायचे किंवा भाषण करायचे. तेव्हा ते पिता म्हणून बघायचे नाहीत. तर पिता म्हणून फार नर्वस व्हायचे. जेव्हा मी परळीहून रात्री बेरात्री निघायचे तेव्हा नगर क्रॉस करताना माझ्या मागे 2-3 गाड्या असायच्या. त्या त्यांनीच पाठवल्या असायच्या, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, झी मराठीवरील किचन कल्लाकार या कार्यक्रमात प्रत्येकाला काहीतरी पदार्थ बनविण्याचं चॅलेंज दिलं जात. त्याप्रमाणे पंकजा मुंडे, रोहित पवार आणि प्रणिती शिंदे यांनाही दिलं होतं. कार्यक्रमात तिघांनीही प्रचंड मस्ती केल्याचं दिसून आलं आहे. मात्र वडीलांच्या आठवणीत पंकजा मुंडे व्याकुळ झाल्याचंही जाणवलं.

थोडक्यात बातम्या-

तो खूपच हाॅट आहे! कार्तिकनंतर सारा अली खान आता ‘या’ अभिनेत्यावर फिदा

पुन्हा सगळंं ऑनलाईन: ‘या’ भागात 1 ली ते 9 वीच्या शाळा बंद

…म्हणून बॉयफ्रेंडने दिला सेक्स करण्यास नकार, अट ऐकून व्हाल चकीत

पुण्यात पुन्हा लाॅकडाऊन?; महापौरांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…

बिग बॉसच्या घरात धक्कादायक प्रकार, अभिजित बिचुकलेची ‘या’ अभिनेत्रीसोबत हमरीतुमरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More