बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एक जागा कायम रिकामी झाली, माझा भाऊ दुष्ट कोरोनाने टिपला”; पंकजा मुंडेंच्या अंगरक्षक भावाचं निधन

बीड | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्येही अनेकांनी आपल्या जवळच्या माणासांना गमवालं आहे. अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या अंगरक्षक भावाचं कोरोनाने निधन झालं आहे. याबाबत पंकजा मुंडेंनी ट्विट करत माहिती दिली आहे.

माझा वाघ भाऊ हो, माझा बॉडीगार्ड गोविंद या दुष्ट कोरोनाने टिपला, असं पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. पंकजा यांनी एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओमध्ये पंकजा यांनी गोविंद यांच्यासोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “‘गोविंद.. एक जागा कायम रिकामी झाली”

कोरोनामुळे राज्यात गंभीर स्थिती उद्भवली आहे. कोरोनाने जवळच्या लोकांना आपल्यापालून हिरावून घेतलं आहे. त्यामुळे घरी रहा, सुरक्षित रहा आणि काळजी घ्या.अनेक नेतेमंडळी, सेलिब्रिटींना कोरोनाने ग्रासलं आहे. सामान्यांची अवस्था बिकट होत चालली आहे. हातावर पोट असेल्यांना लॉकडाऊनमुळे रोजगार उपलब्ध नाही.

दरम्यान, माकप नेते सीताराम येचुरी यांना पुत्रशोक झाला. आशिष येचुरी यांचे कोरोनावरील उपचारांदरम्यान गुरुवारी सकाळी निधन झाले. आशिष यांच्यावर गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. सीताराम येचुरी यांनी ट्विटरवरुन पुत्रनिधनाची दुःखद बातमी दिली.

 

 

थोडक्यात बातम्या- 

“18 ते 45 वयोगटातील सर्व नागरिकांना राज्य सरकारच्या कोट्यातून मोफत लस द्या”

बिनधास्त लस घ्या! लसीकरणानंतर कोरोना होण्याचं प्रमाण केवळ 0.01%

कौतुक करावं तेवढं कमी! मयुर शेळके 50 हजारांपैकी निम्मी रक्कम त्या अंध मातेला देणार

‘हे केंद्र सरकारचं काम नाही, जबाबदारी राज्यावर सोपवावी’; राज ठाकरेंचं मोदींना दुसरं पत्र

ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या तुटवड्याबाबत आम्ही पाया देखील पडायला तयार- राजेश टोपे

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More