बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जिल्ह्याची संस्कृती बिघडवू नका”, त्या’ प्रकरणावरुन पंकजा मुंडेंचा थेट निशाणा

बीड | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय वाद सध्या चांगलाच गाजत आहे. बीड जिल्ह्यात अलिकडेच अनेक घटना घडल्या आहेत. त्या घडामोडीबद्दल आरोप-प्रत्यारोप करण्यात आले आहे. अशातच शहरातील या घटनांबद्दल पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे.

अंबाजोगाईची घटना लाजिरवाणी होती, 18 ते 20 मृतदेहाना एकत्रित आणलं. मी लोकांना भेटत नाही, असं तुम्ही म्हणत होता. आता तुम्ही कुठे आहेत, जिल्ह्यात आम्ही चांगल्या सवयी लावल्या होत्या. चांगले अधिकारी आणले , तुम्ही सर्व पायदळी तुडविले. मी मोदींच्या काळात 52 हजार कोटीचा रूपयाचा निधी आणला. 992 कोटींचा विमा आणले. मराठवाड्यात आम्हीही चिखल तुडवीत गेलो. बीड जिल्ह्याची संस्कृती चांगली करण्यासाठी आम्हाला खुप वेळ लागला होता. माझी पालकमंत्र्यांना विनंती आहे की, कृपया शहराची संस्कृती बिघडवू नका. मी दुर्गाष्मी निमित्त सांगते, माझा कार्यकर्ता तुम्हाला घाबरणार नाही, असं पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना सुनावलं.

आता पक्षात येतो का? अन्यथा बघू तूला, थांब तुझ्यावर केस करतो, अशी परिस्थिती आहे. राष्ट्रवादीची प्रतिमा काय आहे, दहशत काय आहे, हे शरद पवारांनी देखील पाहिलं. चुकीच्या माणसाला पाठीशी घालणं हे देखील चूकीचे आहे. यांना आता घरी बसविलं पाहिजे. मुंडे साहेब दुबईच्या गुन्हेगाराला देखील घाबरले नाहीत. त्या मुंडे साहेबांचं रक्क आमच्या अंगात आहे. सरकारविरोधी आंदोलन करणं हे आमचं दायित्व आहे. सत्ताधारी माफिया राज चालवत आहे. त्यांना सत्ता प्रस्थापित होऊन दोन ते तीन वर्ष उलटले आहेत, तरी देखील त्यांना समाजाचं चांगल कल्याण करता आलं नाही. दसऱ्याच्या आधी सरकारकडून मदत मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.

दरम्यान. अलिकडेच मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यावरून देखील पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर मी शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो होतो. आम्ही कित्येक रात्री जागून काढल्या आहेत. त्यावेळी 124 लोक अडकले होते. त्यावेळी पंकजा मुंडे या अमेरिकेत होत्या, असा टोला धंनजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना लगावला होता.

थोडक्यात बातम्या-

सचिनच्या लेकीचा फोटो, अभिनेत्याचा एक लाईक अन् नव्या चर्चांना उधाण

“ज्यांची बुद्धी कमी असते, त्यांना माझं वक्तव्य समजलं नाही”

काजू-बदाम कशाला??? फक्त शेंगदाणे खा… होतील फायदेच फायदे

अखेर बळीराजाला मदत! ठाकरे सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“ती ऑफर न स्वीकारायला शरद पवार काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More