Top News राजकारण

पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडली; आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय

औरंगाबाद | भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडली असल्याचं समोर आलंय. सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता त्यांनी स्वतःला आयसोलेट करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी ट्विट केलंय. शिवाय यावेळी त्यांनी पदवीधर निवडणुकीत औरंगाबादच्या मतदारांना मतदान करण्याचे आवाहनही केलंय.

पंकजा मुंडे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरिषजी बोराळकर यांना पहिल्या पसंदीचे मत देऊन विजयी करावे. मला सर्दी, खोकला आणि ताप आहे त्यामुळे मी जबाबदारी स्वीकारून isolate झाले आहे.”

दरम्यान ‘अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावं आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी’ असंही मुंडे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद केलंय.

महत्वाच्या बातम्या-

“आपल्यावर शेतकऱ्यांचं कर्ज आहे, लाठ्या-काठ्या, अश्रुधुराच्या माऱ्याने ते फिटणार नाही”

“आता शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करायला काय हरकत आहे?”

बॉलिवूड उत्तर प्रदेशला हलवण्याचा प्लॅन?; चंद्रकांत पाटलांची महत्त्वाची प्रतिक्रिया

फिल्मसिटी उत्तर प्रदेशला नेण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत येणार!

सुप्रिया सुळेंनी उडवली नारायण राणेंची खिल्ली; म्हणाल्या…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या