बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“विषय राजकारणाचा नाही तर अस्तित्वाचा आहे”, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | राज्याच्या राजकारणातील ओबीसी चेहरा म्हणून राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Bjp Leader Pankaja Munde) यांना ओळखण्यात येतं. विविध मागण्यांसाठी पंकजा मुंडे यांनी सरकारला धारेवर धरला आहे. अशातच आता ओबीसी आरक्षणावर (OBC Reservation) सर्वोच्च न्यायलयाच्या (Supreme Court) महत्त्वाच्या निर्णयानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. महाविकास आघाडीला (MVA Government) सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे.

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न आता गंभीर बनत चालला आहे. सर्वोच्च न्यायालयानं इम्पेरिकल डाटा न मिळाल्याच्या मुद्द्यावर आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय आणि सामाजिक मेळावे घेण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारनं ओबीसी आरक्षणाबाबत अध्यादेश पारित केला होता.

महाविकास आघाडीचा हा अध्यादेश सर्वोच्च न्यायालयानं स्थगित केला आहे. यावर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसींची झालेली हानी भयंकर आहे. यात मार्ग निघालाच पाहिजे. विषय राजकारणाचा नाही विषय अस्तित्वाचा आहे. दोषारोप नको मार्ग काढावे, असं आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला रद्द करण्याचा निर्णय हा महाविकास आघाडी सरकारसाठी मोठा दणका मानला जात आहे. राज्य सरकार आधिच मराठा आरक्षण, मुस्लीम आरक्षण, धनगर आरक्षण या पेचात अडकलं असताना आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार आहे.

थोडक्यात बातम्या 

मथुरेत तणावाचं वातावरण, शहरात कलम 144 लागू

शिवसेना काँग्रेसचा हात धरणार का?; संजय राऊतांच्या दिल्ली दौऱ्याने चर्चांना उधाण

ठाकरे सरकारला मोठा झटका! OBC आरक्षणाच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

“आनंद दवे हा डॅंबिस माणूस, त्यांनी…”, शरद पोंक्षेंची फेसबूक पोस्ट चर्चेत

“आईचे दूध पिलेले असेल तर आरोप सिद्ध करून दाखवा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More