बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बाबा नेहमी म्हणायचे राजकारण करायचं तर…’; पंकजा मुंडेंचं वक्तव्य चर्चेत

मुंबई | जुलै महिन्याच्या अखेरीस झी मराठीवर(ZEE Marathi)भेटीला आलेल्या कार्यक्रम बस बाई बस(Bus Bai Bus) हा कार्यक्रम अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय झाला आहे. हा कार्यक्रम खास महिलांसाठी आहे. या कार्यक्रमाचे होस्ट सुबोध भावे(Subodh Bhave) आहेत. तसेच या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील महिला हजेरी लावत असतात. गेल्या काही भागात खासदार सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस यांनीही हजेरी लावली होती.

नुकताच या कार्यक्रमाच्या एका भागाचा प्रोमो झी मराठीने शेअर केला आहे. त्या भागात पंकजा मुंडेनी(Pankja Munde) हजेरी लावलेली दिसते. यावेळी पंकजा यांनी अनेक मुद्द्यांवर दिलखुलास गप्पा मारल्या. सुबोध भावेंनी पंकजांना प्रश्न विचारला की, दुसऱ्या पक्षाचे आमदार कधी फोडलेत का?, त्यावर पंकजा यांनी हो असं उत्तर दिलं. मग सुबोध भावेंनी यावर अजून एक प्रश्न विचारला, कोण कोण फोडलं आणि कधी कधी?,यावर पंकजा म्हणाल्या हे सांगायला एक तास लागेन. मग सुबोध भावे म्हणाले, चालेन आम्हाला.

पंकजा मुंडे यांनी चालू राजकारणाबद्दलही अनेक गोष्टी या कार्यक्रमात सांगितल्या. त्या म्हणाल्या बाबा मला नेहमी सांगायचे बेरजेचे राजकारण करायचे. वजाबाकीचे नाही. त्यामुळे आपल्याकडे बेरीज होते का याकडे पाहायचे. राजकारणात आणि युद्धात जिंकणं महत्वाचं असतं. अशा परिस्थित आपल्याला शोभेल अशी माणसे घेण्याचा मी तरी प्रयत्न करते.

दरम्यान, पंकजा मुंडेंना मंत्रीमंडळ विस्तारात मंत्रीपद न दिल्याने त्या नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, वरिष्ठ नेत्यांना माझी मंत्रीपदाची योग्यता वाटली नसेन. आता यावरून राजकाणात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…असलं काही बोलून, पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा कमी करू नका’; राहुल गांधी मोदींवर बरसले

कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून गुडन्यूज, इतके पैसे होणार खात्यात जमा

ईडीच्या रडारवर असलेल्या भानवा गवळींनी बांधली मोदींना राखी

आरोप करणाऱ्यांना संजय राठोडांचा गंभीर इशारा, म्हणाले…

वरूण गांधीचा पंतप्रधान मोदींना घरचा आहेर, ‘या’ मुद्द्यावरून घेतला खरपूस समाचार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More